आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्ट सेलरची शिकवण:भावनेत तरलता आणायला शिका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुझान डेव्हिडचे सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक “इमोशनल एजिलिटी” हे आपल्याला स्वतःला वेगळे करण्याचे काही तंत्र शिकवते. लेखिकेच्या मते, आपण गरज नसताना अनेक ठिकाणी स्वतःला गुंतवून ठेवतो कारण आपण भावनिकदृष्ट्या तरल नसतो.

स्वतःशी प्रामाणिक राहा बदल घडवण्यासाठी स्वत:शी प्रामाणिक राहायला हवे. सेल्फ कम्पेशन म्हणजे आत्मदया नव्हे. स्वत:ला समजून घेत स्वत:ला वेळ देणे गरजेचे आहे. स्वत:शी काळजी घेणे, प्रत्येक गोष्टीचे नीट निरीक्षण करणे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनवायला हवे.

वास्तविकता स्वीकारावी याचा अर्थ ‑स्वत:शी खोटे बोलू नये. स्वतःकडे व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पाहणे यात वास्तव नाकारता येत नाही, परंतु आपल्यासमोरील आव्हाने स्वीकारता येतात. आपल्याला जर अपयशाला सामोरे जावे लागत असेल तर आपण तेही माणूस म्हणून नशिबी स्वीकारतो.

विचार, भावनेत स्पेस गरजेची आपल्या विचारात आणि भावनांमध्ये एक स्पेस असायला हवी. ती वापरण्याची पद्धत खूपच सोपी आहे. तुम्ही जेव्हा ताण घेता तेव्हा मी तणावात आहे, असे म्हणण्यापेक्षा मला तणावाची जाणीव होतेय असे म्हणायला हवे. थिंकर आणि थॉटमध्ये स्पेस असणे चांगले सिद्ध होते. कारण मनात येणारे विचार आणि जाणीव स्वत:वर ओढून घेण्यात काही अर्थ नाही. प्रगतीची मानसिकता ठेवावी स्वत:च्या प्रगतीची मानसिकता ठेवल्याने अनेक प्रकारच्या ताणतणावापासून स्वत:चा बचाव होऊ शकतो. आपण आता एका नव्या कामात गुंतलो आहोत असे स्वत:ला सांगायला शिका. कोणीच परफेक्ट नसते, आपणही नाही. अापल्याला सतत काहीतरी नवीन शिकायचे अाहे. स्वत:ला आधीपेक्षा उत्तम बनवायचे आहे. चुका करणे शिकण्याच्या प्रक्रियेच्या एक भाग आहे.

बोलण्यातून प्रेरणा मिळावी ज्या प्रकारे आपण आपल्या विचार आणि थॉट-पॅटर्नवर काम करतो त्या प्रकारे आपल्याला प्रेरणा देणाऱ्या भाषेचीही गरज असते. उदाहरण म्हणून, “मला हे करावे लागेल’च्या ऐवजी “मला हे करायची इच्छा आहे’ असे म्हणायला हवे. काही करण्याची इच्छा जास्त प्रेरणा देणारी असते, तर “करावेच लागेल’मुळे आपण उगाच दबावात येतो.

कम्फर्ट झोन तोडायला हवा काही विचार आपल्यापासून दूर ठेवायला हवेत. उदा- ‘गणितात मी कधी चांगला नव्हतो’ किंवा ‘आम्ही नेहमी नवीन लोकांच्या समूहापासून दूर राहतो’ किंवा ‘आम्ही वेगळे आहोत’ इ. हा ऑटोपायलट मोड नवीन आव्हाने स्वीकारण्यापासून प्रतिबंधित करतो.

स्वत:विषयी धारणा बदला तुम्हाला एकाच ठिकाणी अडकून राहायचे नसेल तर तुमच्या भावनांमध्ये लवचिकता आणायला शिका. तुमच्या स्वतःबद्दल असलेल्या संकुचित कल्पना सोडून द्या आणि तुमच्यासाठी अधिक प्रौढ आणि महत्त्वाच्या गोष्टींवर काम करा. त्यातून स्वत:ची प्रगती होईल.

सुझान डे

बातम्या आणखी आहेत...