आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानात्यांनी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा सोपवल्या आहेत की, आपण त्या नकळत विसरतो. घरातील फर्निचर बदलताना किंवा जुन्या वस्तू काढताना काही गोष्टी कधीही काढू नका. ज्या खुर्च्या, टेबल किंवा वस्तू आपले वडीलधारे एकेकाळी वापरायचे... त्या आपले डोळे मिटेपर्यंत सांभाळण्याचा प्रयत्न करा. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, वडीलधाऱ्यांनी वापरलेल्या गोष्टी आपण वापरतो तेव्हा आठवणींचा झरा आपल्याला ताजेतवाने ठेवेल व सकारात्मकताही वाढवेल. निसर्गाने दिलेले वापरता न येणे, ही आपली सवय होऊन जाते. निसर्गाने आपल्याला एक प्रतिनिधी दिला आहे ती म्हणजे गाय. त्यात मातेचा भाव यासाठी ओतला, कारण गाईच्या उपस्थितीने सकारात्मक ऊर्जा मिळते. ज्यांच्याशी आपण जोडले पाहिजे त्यांच्यापासून आपण तुटतो, ही आपली प्रवृत्ती आहे. जमत असेल तर एवढेच करा की, वडीलधाऱ्यांनी वापरलेल्या वस्तू असतील तर त्या सजीव वस्तूंसारख्या आदराने ठेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.