आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोण आहेत नवश्रीमंत लोक नवीन श्रीमंत इतर सर्वांप्रमाणे चालढकल करणाऱ्या जीवन योजना बनवत नाहीत तर वर्तमानात लक्झरी लाइफस्टाइल निर्माण करतात व यासाठी न्यू रिच, नवीन करन्सी म्हणजे वेळ आणि गतिशीलतेचा आधार घेतात. न्यू रिचची व्याख्या अशी आहे - कुठेही जगा, कुठूनही काम करा व नवीन श्रीमंत गटात सामील व्हा.
जीवन खरोखर सोपे आहे आयुष्य इतके अवघड नसावे. ते खरोखर नाहीच. बहुतेक लोक (माझाही समावेश) स्वतःला सांगत राहतात की जीवन कठीण आहे. जर तुम्हाला आरामशीर वीकेंड हवा असेल तर तुम्हाला ९ ते ५ चे कंटाळवाणे काम करावेच लागेल. पुस्तक वाचल्यानंतर हे शक्य आहे की वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्या डेस्कवर बसून काम करावेसे वाटणार नाही.
श्रीमंताची जीवनशैली जगा लोकांना करोडपती व्हायचे नाही. त्यांना जे करोडपतीच खरेदी करू शकतात अशा वस्तू खरेदीचा अनुभव हवा आहे. बँकेत एक कोटी असावेत अशी कल्पना नाही. मुक्त राहणे आणि ती जीवनशैली जगणे हीच खरी कल्पना आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या खात्यात एक कोटी रुपये नसताना तुम्ही करोडपतीसारखे पूर्णपणे मुक्त जीवन कसे जगू शकाल, हा प्रश्न आहे.
निवडक वस्तूंवर लक्ष द्या बहुतेक लोक कामावर घालवलेल्या वेळेनुसार उत्पादकता मोजतात. पण ही वाईट पद्धत आहे. कारण आम्ही बराचसा वेळ वाया घालवतो. टीम तुमचा वेळ प्रभावीपणे घालवण्याचा सल्ला देतात. ८०% निकाल देणाऱ्या २०% गोष्टींवर वेळ घालवा. तुमची सर्वाधिक प्रगती करणाऱ्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
आठवड्यातून ४ तास काम हे पुस्तक बचतीविषयी नाही किंवा ५० वर्षांनंतरच्या गरजांबाबत आज योजना बनवा, असे सांगत नाही. तुम्हाला आजचा आनंद व नंतर पैसा यापैकी एक निवडण्याची गरज नाही. तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असू शकतात. आठवड्यातून ४ तास काम करून महिन्याला ४०,००० डॉलर कमावून परिपूर्ण जीवन कसे जगायचे हे पुस्तक तुम्हाला सांगते.
तुम्हीही होऊ शकता नवश्रीमंत कर्मचारी, व्यापारी आणि विद्यार्थीही नवश्रीमंत होऊ शकतात. जे कर्मचारी बॉसशी बोलून रिमोट वर्किंग करतात, वेळेच्या दहाव्या भागात ९० टक्के निकाल देतात, ते आहेत नवश्रीमंत. असे व्यावसायिक कमीत कमी नफा मिळवून देणाऱ्या ग्राहक-प्रकल्पावर वेळ दवडत नाहीत. गोष्टी आऊटसोर्स करून जगाचा प्रवास करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.