आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:आपला आंतरिक आनंद प्रकट होऊ दिला पाहिजे

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला आनंद प्रकट होऊ द्या. तो प्रकट करण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला मिळालेला आनंद इतरांना वाटून टाका. आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करा. माझ्यासोबत असेल त्याला माझ्यासारखाच आदर मिळावा, असा प्रयत्न श्रीराम नेहमी करायचे. अयोध्येला परत आल्यावर सर्व जण एकमेकांना भेटत होते. श्रीरामाच्या सोबत आलेले वानर भरत आणि अयोध्येतील लोकांची स्तुती करत होते. श्रीरामांनी त्या बाजूचे नेतृत्व केले होते. या वानरांना धोरण, प्रतिष्ठा शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. गुरू वसिष्ठांशी कसे वागावे, हे वानरांना कळत नव्हते. तेव्हा रामाने त्यांना शिकवले. ‘पुनि रघुपति सब सखा बोलाए। मुनि पद लागहु सकल सिखाए॥’

सर्वांना बोलावून ऋषींच्या चरणी नतमस्तक व्हायला शिकवले. जवळच्या लोकांना काही गोष्टी शिकवाव्या लागतात. येथे नीती शिकवताना श्रीराम स्वत: आपल्या गुरूंना मान देण्याचे आचरण करायला विसरत नाहीत. ‘गुरु वशिष्ठ कुल पूज्य हमारे। इन्ह की कृपा दनुज रन मारे॥’ हे गुरू वसिष्ठ आमच्या कुळासाठी पूज्य आहेत. त्यांच्या कृपेनेच युद्धात राक्षस मारले गेले. शिकवण आणि सन्मानाची क्रिया एकत्रितपणे करण्याची कला श्रीरामाला चांगलीच माहिती होती. चेहऱ्यावरून मनातले ओळखण्याची दृष्टी श्रीरामाकडे होती.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...