आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसिपी:चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेऊया...

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मसाला पाव { साहित्य : पाव- ४ , जीरा- छोटा चमचा, अदरक-लसणाची पेस्ट-१ छोटा चमचा, कांदा- कप बारीक चिरलेला, टोमॅटो- कप बारीक चिरलेला, ढोबळी मिरची- कप बारीक चिरलेली, बटर - २ छोटे चमचे + १ मोठा चमचा (वरुन लावण्यासाठी), पाणी- कप किंवा आवश्यकतानुसार, हळद- छोटा चमचा, पाव भाजी मसाला- २ छोटे चमचे, तिखट- छोटा चमचा, मीठ- चवीप्रमाणे सजवण्यासाठी- कोथिंबीर- २ मोठे चमचे, कांदे- २ मोठे चमचे बारीक चिरलेले. { कृती : तव्यावर एक छोटा चमचा बटर िवतळवून घ्या आणि त्यात जिरे घाला. त्यात अदरक-लसणाची पेस्ट टाकून परतून घ्या. कांदा आणि मीठ घालून पुन्हा परता. कांदा थोडा तांबूस झाल्यावर त्यात टाेमॅटो आणि ढोबळी मिरची घाला आणि परता. जेव्हा कांदा आणि ढोबळी मिरची चांगली शिजल्यानंतर त्यात थोडी हळद, तिखट आणि पाव भाजी मसाला घाला. एक कप पाणी घालून चांगले घट्ट होईस्तोवर शिजवा. आता एक छोटा चमचा बटर आणि कोथिंबीर घालून मसाल्याला तव्याच्या एका बाजूला ठेवा. तव्याच्या दुसऱ्या भागात बटर घाला आणि पाव मधून कापून दोन्ही बाजूने भाजून घ्या. आता पावाच्या आतील बाजूस मसाला भाजी (जी तव्याच्या एक बाजूला ठेवली आहे. )घाला. तयार झालेल्या मसाला पावावर कांदा आणि कोथिंबीर घालून वाढा.

पोहे मसाला इडली { साहित्य : इडली साठी- पोहे- १ कप, रवा- कप, दही- कप, मीठ- २ छोटे चमचे, बेकिंग सोडा - छोटा चमचा, कोथिंबीर- मूठभर तेल- १ मोठा चमचा, मोहरी- १ छोटा चमचा, जीरे- छोटा चम्मच, वाळलेली लाल मिरची- १, कांदा- १ बारीक चिरलेला, हिरवी मिरची- १-२ बारीक चिरलेली, लाल टोमॅटो- १ बारीक चिरलेला, हळद- छोटा चमचा, तिखट- छोटा चमचा, धणे पूड- छोटा चमचा, गरम मसाला- छोटा चमचा, मीठ- चवीनुसार, दही- १-२ मोठे चमचे { साहित्य : पोहे धुवून पाणी काढून टाकावे. पोहे, रवा, दही, मीठ, खाण्याचा सोडा आणि कोथिंबीर पाणी न टाकता बारीक वाटून घ्या. मिश्रणाचा एक गोळा करा आणि तळहाताने हलके दाबून घ्या. होल प्लेटला तेल लावा. इडली पात्रात पाणी गरम करा. उकळी आल्यावर इडलीचे ताट पात्रात ठेवून त्यावर झाकण ठेवा. दहा ते पंधरा मिनिटे शिजवा. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि लाल मिरच्या टाका. कांदे घालून सोनरी तांबूस होईपर्यंत तळा. हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून काही मिनिटे परतून घ्या. हळद, धणे पूड, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ मिक्स करा. दोन चमचे पाणी घालून मिक्स करा. दही घाला आणि काही सेकंद परता आणि शिजवा. त्यात सर्व वाफवलेल्या इडल्या घालून मिक्स करा. वरून कोथिंबीर घाला आणि दह्याबरोबर सर्व्ह करा.

बातम्या आणखी आहेत...