आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:मुलांकडूनही जीवनात धडा मिळू शकतो...

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुपारचे दोन वाजले हाेते, सूर्य डोक्यावर होता, सर्वत्र वाळूच वाळू दिसत होती. माझ्या कारचे एअरकंडिशनर न्यूनतम तापमानावर चालत होते. मी राजस्थानच्या वाळवंटातून जात होतो. तेथे मुश्किलीने एखादे झाड दिसत होते. शंभर मीटर दूरवर एक सात ते आठ वर्षांची मुलगी माझ्या कारकडे इशारा करत पळत आली. माझी गाडी कुठून क्रॉस होईल तिला माहीत होते. माझ्या कारच्या आधी ती तेथे पोहोचली. मी पावसाळ्यात येथे आलो होतो तेव्हा येथील छोटी मुले स्थानिक फळे विकत असत. कार पाहताच कारजवळ येत. येथे मशरूम सर्वात जास्त विकले जातात. मात्र या मुलीकडे काहीच नव्हते. ती मुलगी अशा कडक उन्हात १५० मीटर पळत आमच्या कारच्या मागे आली होती. तिच्या पायात काहीच नव्हते. मला ते पाहून वाईट वाटले. कारण मी तिला कारमध्ये बसवून तिच्या झोपडीपर्यंतही सोडू शकत नव्हतो. कारण तेथील रस्ता खूप छोटा होता. तेथे अशी मोठी कार जाणे शक्य नव्हते. माझ्याकडे तिच्या मापाची चप्पल नव्हती, जी तिला मी देऊ शकलो असतो. मी जेव्हा चालकाला विचारले, ती आपल्याकडे अशी पळत का आली ? तेव्हा तो म्हणाला, पैसे मागण्यासाठी. मी तिला पैसे दिले असते तर ते घरात खर्च झाले असते आणि चप्पल घेणे होणार नाही, मी असा विचार करत होतो.. मी चालकाला गाडी थांबवण्याचे म्हणेपर्यंत तो गाडी वेगाने पुढे घेऊन आला होता. मी मागे वळून पाहिले तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावर निराशा होती. चालक म्हणाला, तुम्हाला येथे असे बरेच लोक पाहायला मिळतील, कदाचित त्याच्या दृष्टिकोनातून तो योग्य असेलही.

पण मी बाहेरून आलो हाेतो, त्या निराश मुलीच्या चेहऱ्याने माझ्या मनावर छाप सोडली. हा नवा अनुभव होता. कारण माझ्या गाडीत नेहमी काही ना काही असते. पाण्याच्या बॉटल तर नेहमी असतात. त्या मी पोलिसांना, मुंबईच्या वाहतूक सिग्नलवर उभ्या असलेल्या गरीब आणि बेवारस मुलांना देत असतो. शिवाय छोटे-छोटे ग्लुकोजचे पॅकेट्स असतात तेही मी मुलांना देत असतो. या मुलीने मला बालपणी शाळेत शिकवलेल्या सहानुभूतीच्या धड्याची अाठवण करून दिली. सहानुभूतीचा अर्थ असतो दुसऱ्याची भावना समजून घेणे, त्याची कल्पना करणे, कोणी काय विचार करत आहे, त्यांना काय जाणीव होतेय ते समजून घेणे, दुसऱ्याच्या नजरेने काही गोष्टी समजून घेणे, दुसरे जे सांगत आहेत, ते लक्षपूर्वक ऐकणे आणि दुसऱ्याची दु:खे समजून घेणे.

मी चप्पल-बुटाच्या एका दुकानावर थांबलो आणि लहान मुलांसाठी काही चपलांचे जोड विकत घेतले. ते मी चालकाला दिले. मला सोडून तो थेट त्या मुलीच्या वस्तीवर जाईल आणि तिला चप्पल देऊन टाकेल, त्याने तसे मला वचन दिले होते. तो नक्की जाईल.

त्या मुलीने मला एक चांगला धडा शिकवला. आता मी मुंबईला जाऊन काही चप्पल-बूट विकत घेईन आणि आपल्या कारच्या डिकीत ठेवेल. जी मुले मुंबईच्या डांबर आणि सिमेंट रोडवर उभी राहतात त्या मुलांना मी त्या चपला देईन. राजस्थानमधील अनवाणी पायाने फिरणाऱ्या एका मुलीने मला शिकवलेला धडा या उन्हाळ्यात मुंबईतील काही गरीब मुलांना दिलासा देईल. हिवाळ्यात ब्लँकेट वाटप करणाऱ्यांनी उन्हाळ्यातही चपला वाटण्याचा विचार करावा, असे मी आवाहन करेन!

एन. रघुरामन
मॅनेजमेंट गुरू
raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...