आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुली खिडकी:आयुष्य सुंदर आहे, ते आणखी चांगले बनवण्याची कला शिका...

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रोबेर्तो बेनीन्यीचा चित्रपट "लाइफ इज ब्यूटीफुल' १९९७ मध्ये आला होता आणि याच्या अनपेक्षित यशाने प्रेक्षक व समीक्षकांना चकित केले होते. हा चित्रपट नाझींच्या छळ छावण्यांच्या पार्श्वभूमीवर असूनही तो विनोदी चित्रपट होता. यात एका वडील आणि मुलाची कथा आहे. दोघेही छळ छावणीमध्ये कोडे सोडवत, आपल्या आयुष्याच्या बळावर अडचणींचा सामना करतात. मूळ आशावाद, विनोद, कल्पनाशक्ती आणि मानवी ओळखीचे चित्रण यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम आणि तीन अकादमी पुरस्कार मिळाले.

प्रतिकूल परिस्थितीतही हसत राहा...
उद्या आयुष्य तुमच्यासमोर कोणती आव्हाने सादर करणार आहे हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. तुमची वृत्ती सकारात्मक असेल आणि तुम्ही हसत हसत समस्यांचा सामना करत आहात तर यामुळे त्या सुटणार तर नाहीत, पण यामुळे तुम्ही स्वत:ला त्यावरील उपायांसाठी एका चांगल्या स्थितीत नक्कीच ठेवू शकाल. "लाइफ इज ब्यूटीफुल' आम्हाला शिकवते की, प्रतिकूल परिस्थितीतही हसत राहण्याची क्षमता कायम ठेवा आणि आपल्यातील चैतन्य मरू देऊ नका. तुम्ही हिंमत केल्यास कोणता ना कोणता मार्ग नक्की निघेल.
आपल्या गुणवत्तेचा शोध घ्या...

तुम्ही नेहमीच एखाद्या गोष्टीत चांगले असू शकता. प्रश्न हा आहे की, तुम्ही तुमच्यातील छुपी गुणवत्ता शोधण्यासाठी किती परिश्रम घेता. या चित्रपटात नायक कोडे सोडवण्यात हुशार आहे. तो याचा वापर छळछावण्यांमध्येही आनंदी राहण्यासाठी आणि आपल्या मुलास प्रसन्न ठेवण्यासाठी करतो. त्याची कल्पनाशक्ती हीच त्याची ताकद बनते.

अखेर गोष्टी चांगल्या होतात...
संकट आल्यास आपण गोंधळलेल्या स्थिती असणे स्वाभाविक आहे, पण अनुभव सांगतो, वाइट काळही अखेर निघून जातो. आयुष्य विषम आहे, तर ते समही आहे. सर्जनशीलतेने परिस्थितीचा सामना करा. ती तुम्हाला असा धडा शिकवेल की, ती मोठ्यातल्या मोठ्या संपदेद्वारेही बदलता येणार नाही.

मुलांसमोर योग्य दृष्टिकोन ठेवा...
मुले तुम्हाला पाहून शिकतात. तुम्ही संकटात नियंत्रण ठेवणार नसाल तर यामुळे विचलित व्हाल. मात्र, तुम्ही सकारात्मक वृत्ती कायम ठेवल्यास स्वत: सुरक्षित असल्याची जाणीव राहील. मुलांना भेटवस्तू म्हणून आपली सकारात्मकता द्या.

चित्रपट : लाइफ इज ब्यूटीफुल
दिग्दर्शक आणि नायक : रोबेर्तो बेनीन्यी : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, कॉमेडियन. २ ऑस्करसह अनेक अांतराष्ट्रीय पुरस्कार विजेते.

बातम्या आणखी आहेत...