आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडा:आयुष्य खूप लहान आहे, कमी पळण्याचा प्रयत्न करा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फंडा असा की, अनेक दशकांपासून असे सांगितले जात आहे की, गोष्टींना सोपे बनविण्याची गरज आहे, परंतू ज्या धावपळीच्या काळात आपण आहोत, तिथे हे खूप गरजेचे होऊन जाते.

ही माझीच चूक होती. या बुधवारी जेव्हा जोधपुरचे वमान थांबले, तेव्हा मी घाईघाईने हाताचे सामान उचलले आणि खूप महत्वाचे काम असल्यासारखे पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा माझ्या पुढे उभा असलेला प्रवासी त्याला त्रास झाल्यासारखे भासवत माझ्यावर खेकसू लागला, ‘तुम्हाला असे वाटते का की, तुमच्याकडे अॅपलाचा लॅपटॉप आहे, आयफोन आहे म्हणजे तुम्ही खूप उच्चशिक्षित आहात का? तुम्हला सर्वाजनिक ठिकाणी कसे वागावे? याचे काही कायदे आहेत. मागे बसलेला व्यक्ती प्रवासी बाहेर निघायच्या रस्त्यात येऊन रस्ता अडवू शकत नाही, ज्यांनी पुढच्या त्या जागांसाठी अधिकचे पैसे दिलेले आहेत.’ तो सलगपण बडबड करत माझ्या आत्मसन्माला ठेच पाेहचवत होता. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की, माझ्याकडेही अशीच अधिकचे पैसे दिलेली एक सीट होती, जी सीट माझी होती. पण हे बाेलताना मी तितक्या आत्मविश्वासाने बोलत नव्हतो आणि माझ्याकडे शब्दांचा तुटवडा होता. त्याचे बडबडणे सुरूच होते. तेव्हा एक हवाईसुंदरी माझ्यावतीने बोलण्यासाठी पुढे सरसावली. तिने त्याच्या कानात काहीतरी पुटपुटले आणि ताे शांत झाला व त्याने पुढे जाण्यास रस्ता दिला.

मी त्यांच्यापैकी आहे, ज्याना ३० मिनीटात पिझ्झा नको आहे. माझ्या आयुष्यात फार कमी वेळेस मला खूप घाई असते. मी याच कॉलममध्ये अशा व्यक्तींबद्दल ही लिहीले आहे, जे विमान येण्याआधीच आपल्या जागेवरून उठून उभे राहातात. परंतू या बुधवारी मी देखील असेच केले, ज्याला माझा सहसा विरोध असतो. माझे ५८ वर्षांचे नातेवाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा मला मेसेज आल्याने मी असे केले असावे. आकाशात उंचावर उडणाऱ्या विमानात मी काहीही करू शकत नव्हतो, कुणाशी बोलू शकत नव्हतो, हे सर्व असे झाले, मलाच माहीत नाही. काही सेकंदातच मोबाइलचे कनेक्शन ही गेले. तुम्ही विचार करू शकता की, आयुष्यातील सर्वात वाईट घटना माहित असूनही दोन तासांहून अधिक वेळ असेच बसावे लागत असेल तर माझे काय झाले असेल?

मी अनेक कारणांमुळे रागाला आलो होतो. केवळ यासाठी नाही तर अशावेळी ही घटना समजली, ज्यावेळी मी काहीच करू शकत नव्हतो, परंतूत त्यापेक्षा यासाठी रागात होतो की, माझे भावजी ही डॉक्टर आहेत, जे खूप प्रसिद्ध व्यक्तीमत्व असून त्यांचे सोशल मीडिया, जसे की फेसबुकवर हजारो फॉलोअर्स होते. डॉ. तिरुमलईस्वामी थिरुनारायण सिद्ध मेडिसिनचे विशेषज्ञ आहेत आणि कोविडच्या खूप पूर्वी त्यांनी हजारोंची मदत केल्याने ते प्रसिद्ध हाेते. सध्याला ते ताडपत्रांवर लिहीलेल्या सर्व पांडू लिपींना डिजिटलाइजेशन करण्यात व्यस्त आहेत, ज्या औषधींचे ज्ञान सामान्य लाेकांना नाही आणि यासाठी दक्षिण भारतातील सर्वच मेडिकल प्रोफेशनल्सनी त्यांचे कौतूक करत त्यांना पूर्णत: सहकार्य करण्याचे अभिवचन दिले होते. मी ज्या तज्ञ डॉक्टरांना ओळखतो, त्यापैकी हे एक होते. ‘सिद्ध’ ला ज्या विशिष्ट ओळखीचेी गरज होती, त्याला चालना देणाऱ्यांचे ते प्रमुख होते. माझे भावजी आहेत म्हणून मला अभिमान होताच पण त्यांचे सामाजिक कार्य ही तितकेच होते. वेळेत काम पूर्ण करण्याच्या घाईत ते कायम असायचे. आजारी असतानाही ते प्रवास करायचे. या विचारांनीच मला विमान प्रवासात काही खावेसे वाटले नाही. हवाई सुंदरीने माझे पाणावलेले डोळे पाहीले. तसेच माझी सीट माझ्या मित्राजवळ करून दिली. यासाठी ते कसे गेले? हे जाणून घ्यायची मला उत्सुकता होती. यातच मी बाहेर पडण्याची घाई केली आणि स्वत:ला थोडे स्लो-डाउन करायचे विसरलो.

मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन