आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवारी गुरुपर्वाला देशभरातील गुरुद्वारांमध्ये अनेक कार्यक्रम झाले. सर्वात व्यग्र राहणाऱ्या शीख समुदायातील लोकांनी गुरुद्वारांमध्ये विविध सेवा उपक्रमांत भाग घेतला. लंगरमध्ये जास्तीत जास्त सेवा दिल्या. रविवारपासूनच अनेक शीख कुटुंबांनी मंगळवारच्या लंगरसाठी अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी गुरुद्वाराच्या फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. ते असे फक्त गुरुपर्वालाच करतात, असे नाही, परंतु लोक विशेषत: येत होते, कारण प्रत्येक जण त्यांच्या श्रद्धेने पाठ करण्याचा स्वतःचा मार्ग शोधत होता. या सोमवार-मंगळवारी मी दिल्लीहून डेहराडूनला गेलो आणि परत आलो तेव्हा मला दोन शीख बांधवांशी ओळख झाली. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील रहिवासी हरपाल आणि बलविंदरसिंग यांनी मंगळवारी गुरुनानक यांच्या जयंतीपूर्वी उत्तराखंडमधील १६ गरजू शेतकऱ्यांना ५ कोटी रुपयांची त्यांची १२ एकर जमीन दान केली. या पावसाळ्यात उत्तराखंडच्या या शेतकऱ्यांच्या जमिनी परवीन नदीच्या पुरात वाहून गेल्याचे या बांधवांना माहीत होते. त्याच वेळी पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या २० एकर जमिनीतील माती पूर्णपणे वाहून गेली. गेल्या रविवारी या बांधवांनी महसूल अधिकाऱ्यांसमोर शेताची कागदपत्रे दिली, भविष्यात आणखी ४ एकर जमीन दान करण्याचा त्यांचा विचार आहे. हे चार भाऊ असून त्यांची उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात १२५ एकर जमीन आहे. हरपाल आणि बलविंदर यांनी या निर्णयावर परदेशात राहणाऱ्या त्यांच्या इतर दोन भावांशी चर्चा केली आणि त्यानंतर चौघांनीही एकत्रितपणे १६ एकर जमीन दान करण्याचा निर्णय घेतला. १२५ एकर जमीन असलेल्यांची तुलना आपल्यासारख्या सामान्यांशी कशी करता येईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मी तुमचे लक्ष एका नवीन घटनेकडे वेधू इच्छितो. पूर्व बंगळुरूमध्ये अनेक रहिवासी क्रिकेट खेळताना दिसले! यात नवीन काय आहे, असे म्हणू नका, कारण संपूर्ण भारत क्रिकेट खेळतो व हा फक्त खेळ नसून बहुतांशांसाठी धर्म आहे. थोडे थांबा. त्यांनी या खेळाला धर्म बनवले आहे आणि तोही देण्याचा धर्म! धक्का बसला? पुढे वाचा. या रहिवाशांनी त्यांचे सामने कोण पाहतील किंवा प्रायोजित करतील किंवा हा वयोगट टी-२० च्या प्रेमात आहे, याची चिंता न करता ३० हून अधिक संघ तयार केले. त्याचे प्रवेश शुल्क ५५०० रुपये होते. आणि एलिमिनेशन फेरी २९ ऑक्टोबरला सुरू झाली. त्यांना कॉर्पोरेटकडून प्रायोजकत्व मिळाले आणि त्यांचे उद्दिष्ट केवळ निरोगी शेजारच नव्हे, तर तेथील सरकारी शाळेतील २२ गरीब मुलांच्या गणवेश आणि स्टेशनरीचा खर्च उचलणे हा आहे. त्यांना १.९८ लाख रुपये मिळाले. ते इथेच थांबले नाहीत. सरकारी शाळांमधून खऱ्या गरजू मुले निवडताना त्यांना आठवी ते दहावीच्या वर्गातील १८३ विद्यार्थी आढळले, त्यांना इंग्रजी अभ्यासक्रम कन्नडमध्ये अनुवादित करून समजण्यास कठीण जात होते. या गटाने या सर्व मुलांसाठी इंग्रजीतून कन्नड आणि कन्नड ते इंग्रजी शब्दकोश उपलब्ध करून दिला. यावरून मला एका जुन्या श्लोकाची आठवण झाली: ‘वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनम्। वृथा दानम् धनाढ्येषु वृथा दीपो दिवाऽपि च॥’ समुद्रात पावसाचे महत्त्व नाही, पोट भरलेल्या माणसाला अन्नाचे महत्त्व नाही. तसेच श्रीमंतासाठी दानाचे महत्त्व नाही आणि दिवसा सूर्यप्रकाशात बल्ब लावण्याचे महत्त्व नाही.
फंडा असा ः काही द्यायचे असेल तर ते खऱ्या गरजूंना द्या आणि समाजात सन्मान मिळण्यासाठी किंवा फक्त फेसबुकवर अपडेट करण्यासाठी ते करू नका!
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.