आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक पंचनामे:दीड लाख अतिवृष्टीग्रस्तांची  जालना महसूलने पाठवली यादी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीग्रस्त ३ लाख ६९ हजार ६८० शेतकऱ्यांपैकी दीड लाख जणांचे बँक खाते, आधार, मोबाइल क्रमांकासह यादी जालना जिल्हा महसूल यंत्रणेने शासनाला पाठवली. उर्वरित सव्वादोन लाखांची यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पीक पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला पाठवून अनुदानाची मागणी करणे ही नेहमीची प्रक्रिया आहे. यानुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी बँक खात व आधार क्रमांकांसह याद्या तयार केल्या. मात्र, सरकारने नवा फतवा काढत थेट बाधितांच्या आधार क्रमांकावर नमूद असलेले नाव, मोबाइल क्रमांक, बँक खाते क्रमांक, बाधित क्षेत्र अशी इत्थंभूत माहिती मागवली. यानुसार मागील तीन आठवड्यांपासून त्या-त्या गावचे तलाठी याद्या अपडेट करण्यात व्यग्र आहेत.

बातम्या आणखी आहेत...