आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:कमी किंमत, वातावरणामुळे उपाहारगृहात वर्दळ

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ही पूर्णपणे रेल्वेच आहे. त्यात संकटकाळात अोढण्याची साखळी आहे. पंखे, आरसे, कोच क्रमांक आणि आसनाची माहिती, सामान ठेवण्यासाठी वर बनलेला स्टीलचा सेल्फ हे सर्वकाही आहे. मात्र खिडकीतून बाहेर पाहिले की तुम्हाला धावती दृश्ये दिसतात. तुम्ही विचार करत असाल की, ज्या रेल्वेत आपण बसलो आहोत ती केवळ ३० सेकंदात इतक्या वेगाने गावांची तसेच डोंगरांची दृश्ये कशीकाय दाखवू शकते? त्याचे कारण म्हणजे खिडक्यांमध्ये टीव्ही लावण्यात आले आहेत. दृश्ये आहेत १९६० ते २०२२ दरम्यानच्या चित्रपटांची.

तामिळनाडूच्या मदुराईतील सिने सुवई (चित्रपट आणि स्वादासाठी तामिळ शब्द) उपहारगृहात तुमचे स्वागत. ही रेल्वे तामिळ सिनेमांतील संवादांनी भरलेली आहे. त्यात शिवाजी गणेशनपासून रजनीकांत, कमल हसन, माधवन ते सुर्यापर्यंतच्या अभिनेत्यांचे लोकप्रिय संवाद खाण्याशी जोडून लिहिले आहेत. लिलावात हा कोच दोन तुकड्यांत कापून मदुराईत आणण्यात आला. कारण ७० फूट लांब कोच वाहून आणण्यासाठी ट्रक मिळाला नाही. तो पुन्हा जोडून सजवण्यात आला. छत आणि बंदीस्त करून, जमिनीवर बोर्ड आणि इतर आवश्यक ती पुनर्रचना करून ७० लोकांसाठी वातानुकूलित डायनिंग हॉल तयार करण्यात आला.

रेल्वेच नाही तर भंगारातील काळ्या-पिवळ्या फिऍट पद्मिनी टॅक्सीलाही नवे रूप दिले. कारचे नाव आहे लक्ष्मी. ती रजनीकांत यांनी दशकांपूर्वी ‘पडीकादवन’ चित्रपटात वापरली होती. गाडीला स्टेअरिंग, अॅक्सेलेटर वा ब्रेक नाहीत. दोन भागात विभागली आहे. छत हटवले आहे. कारण उंच ग्राहक बसू शकतील. टॅक्सीत चार लोक समोरासमोर बसू शकतात. बोनेटवर लिहिले आहे- ‘लक्ष्मी स्टार्ट होणार नाही!’ येथे कॅसिनो पोकर टेबलही आहे. त्याच्या वर स्पोर्ट्स बाइक दिसते. एका विभागात डिस्को सीन व ऑटोचा सेल्फी बूथ आहे. तेथे अजित, कमल हसन व धनुषसारख्या कलाकारांच्या चित्रपटातील दृश्ये आहेत. उपहारगृहाच्या समोरच्या भागात जुन्या काळातील चित्रपटांची पोस्टर्स दिसतात. ३०० आसनांच्या उपहारगृहाला सजवण्यासाठी सीईओ विचित्र राजसिंह यांना १५ महिने लागले.आज ते तरुणांमध्ये दोन कारणांमुळे प्रिय आहे. चांगल्या खाण्याशिवाय तरुणांना सेल्फीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. हे तरुण गावातील जीवनशैलीचा आनंद घेण्यासाठी ‘घरपोच सेवेच्या’ कल्पनेतून बाहेर पडू इच्छितात. सोशल मिडीयावर टाकण्यासाठी येथे त्यांना अनेक छायाचित्रे काढता येतील.

२०२२ मध्ये तुम्ही कधी २ रुपयांचा आइसक्रीम कोन खाल्ला? होय, चेन्नईत ‘विनूज इगलू’वर आइसक्रीम याच किमतीत मिळते. वी. विनोथचे पिता विजयन यांनी १९९५ मध्ये त्याची सुरुवात केली. तेव्हा १ रुपयात कोन मिळायचा. काही आठवड्यातच २ रुपयांना झाला. ही किंमत २००८ पर्यंत कायम राहिली. त्यानंतर दुकान बंद पडले. फेब्रुवारी २०२२ मध्ये विनोथ यांनी त्याच किमतीत पुन्हा सुरू केले. उपहारगृहातील मिनी कोन आइसक्रीमही मुलांमध्ये प्रिय आहे. विनोथ यांना काहीच नफा होत नाही, मात्र त्यामुळे दुकानात येणारे लोक दुसऱ्या वस्तू खरेदी करतात.फंडा असा : दारात घरपोच सेवेची सवय लागलेल्या ग्राहकांना अशाच प्रकारचे पदार्थ वा उपाहारगृहे आकर्षित करू शकतात. येथे किंमत तर कमी आहेच. शिवाय मनसोक्त छायाचित्रे काढण्याची संधीही मिळते.

एन. रघुरामन