आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशास्त्रात बोधवाक्ये लिहिलेली असतात. कधी कधी लिहिल्या गेलेल्या गोष्टी वाचून वाटते, अशी व्यक्ती असू शकते का? परंतु, आजूबाजूला नजर टाकली तर अशा महान व्यक्ती आपल्या आयुष्यात अवतरल्याचे जाणवेल. रामकथेबाबत काक भुषुंडीजी गरुणजींना म्हणाले होते, ‘बिरति बिबेक भगति दृढ़ करनी। मोह नदी कहं सुंदर तरनी।’ ती वैराग्य, विवेक आणि भक्ती मजबूत करते. आणि मोहरूपी नदी पार करण्यासाठी एक सुंदर नाव आहे. या चार गोष्टी रामकथेत तर आहेत, पण त्या एखाद्या व्यक्तीमध्ये असू शकतात का? आज आपण अशाच एका व्यक्तीचे स्मरण करत आहोत, ते म्हणजे भगवान महावीर. ते केवळ जैन समाजातील दिव्य पुरुष नाहीत. संपूर्ण मानवजात भगवान महावीरांकडून जीवनाचा संदेश घेऊ शकते. भगवान महावीरांच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपल्याला दिव्यापेक्षा वातीकडून अधिक अपेक्षा हवी. महावीरांना दिवा मानाल तर भ्रमात पडाल आणि ज्योती मानाल तर खूप काही मिळेल. त्या चार गोष्टी त्यांच्यात उतरतात, ज्या रामकथेत आहेत. वैराग्य, विवेक, भक्ती आणि मोह हे समजून घ्यायचे असेल, तर महावीरांची जीवनकथा आजच्या काळात अगदी चपखल बसते.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.