आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:लोकप्रिय करण्यासाठी खाद्यपदार्थाला सोयीस्कर आणि आकर्षक बनवा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या काळी प्रत्येक शाळेच्या बाहेर एक म्हातारी टोपली घेऊन बसायची आणि मध्यंतर किंवा शाळा सुटण्याची वाट पाहत असे. अवघ्या दोन पैशांत ती तळलेल्या किंवा उकडलेल्या बोरांनी भरलेल्या पानांचा द्रोण द्यायची, त्यावर ती थोडे मीठ आणि पावडर शिंपडायची. तीन तास काहीही न खाता वर्गात बसल्यानंतर माझ्यासारख्या शाळकरी मुलासाठी ती बोरे सर्वात चवदार लागत असत. प्रत्येक गावात शाळेबाहेर, रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा जत्रेत अशा खाद्यपदार्थांचे विक्रेते असायचे. गरीब भारत रस्त्यावर विकली जाणारी अशी बोरे खात असे, तेव्हा विकसित देश असे धान्य खात असत जे नंतर जगातील सर्वात आवश्यक स्नॅक्स बनले. ज्याप्रमाणे बोराची झाडे भारताच्या बहुतांश भागांत आढळतात, त्याचप्रमाणे हे धान्य मध्य अमेरिकेत पिकत असे आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात ते अमेरिकेत लोकप्रिय झाले. त्या वृद्ध स्त्रिया ज्या प्रकारे भारतीय शाळांबाहेर बसायच्या, त्याच पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील रस्त्यांवर पॉपकॉर्न विकणारे आढळत. ते बनवणे सोपे होते, त्यामुळे त्याची किंमत कमी होती, त्यामुळे महामंदीदरम्यान त्याची लोकप्रियता वाढली. सिनेमा जगभर पसरला तसतशी थिएटर मालकांनी पॉपकॉर्न विक्रेत्यांना चित्रपटगृहांच्या बाहेर त्यांचा माल विकण्याची परवानगी दिली. त्यासाठी ते त्यांच्याकडून पैसे घेत असत. पण, १९४० च्या दशकाच्या मध्यापर्यंत थिएटर चालकांनी थिएटर लॉबीमध्ये स्वतःचे स्टॉल लावायला सुरुवात केली.

पॉपकॉर्नने भरलेल्या या स्टॉलमुळे चित्रपटगृह उद्योगाची भरभराट होण्यास मदत झाली आणि तेव्हापासून चित्रपट पाहताना पॉपकॉर्न खाण्याची प्रथा आहे. हळूहळू हा नाष्टा इतका लोकप्रिय झाला की, १९ जानेवारीला अमेरिकेत राष्ट्रीय पॉपकॉर्न डे साजरा करण्यात येऊ लागला. आज केवळ अमेरिकाच नाही, तर जगभरातील चित्रपटप्रेमी पॉपकॉर्नशी परिचित आहेत. हे एक अतिशय सोयीचे अन्नही आहे आणि चुकून खाली पडल्यास जमिनीवर डाग सोडत नाही. म्हणूनच थिएटर ऑपरेटर्सने चित्रपट हॉलमध्ये त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. आपल्याला सवय झाल्यावर त्यांनी भाव वाढवायला सुरुवात केली, त्यामुळे आज ते थिएटरमधील अनेकांच्या आवाक्यापलीकडची गोष्ट आहे. त्यांनी ते वेगवेगळ्या आकारांत आणले आहे आणि ते कोनाऐवजी बादल्यांमध्ये देऊ लागले आहेत.

या मंगळवारी मला पॉपकॉर्नच्या या छोट्याशा इतिहासाची आठवण झाली, कारण भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह म्हणाले की, थिएटरमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ खायचे की नाही हा पूर्णपणे चित्रपट पाहणाऱ्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे आणि लोक तिथे मनोरंजनासाठी जातात. मीडियाने सरन्यायाधीशांचा हवाला देत म्हटले की, पॉपकॉर्न खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाही.

फंडा असा ः अन्न तेव्हाच लोकप्रिय होऊ शकते जेव्हा आपण एका वेळी एकच खाद्यपदार्थ निवडतो, ते खाणे आणि विकणे सोयीचे असते आणि जे आपल्याला ते विकत घेण्यास आकर्षित करण्यात यशस्वी होते.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...