आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:ज्ञानासाठी वेळ काढा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकथित गोष्टी ऐकण्याची क्षमता निर्माण करा. म्हणूनच अकथित गोष्टी ऐकल्याने ज्ञान मिळते, सांगितले जाते ते ऐकून माहिती मिळते, असे म्हणतात. आता हे अकथित काय आहे? असे किती तरी शब्द, विचार, माहिती अशी असते की खोलात जाऊन तिचा अर्थ काढावा लागतो. येथूनच ज्ञानाची सुरुवात होते. आपण देव असल्याचे ऐकले आहे. देवाला जाणून घेण्यासाठीच तर ज्ञानाची गरज आहे. आणि बरेच काही अकथित आहे. जीवनातील अकथित गोष्टी ऐकायच्या असतील तर आत्म्याकडे वळून ऐका. आत्म्याचे शब्द ऐकू येत नाहीत. सर्व काही अकथित आहे. ते आपल्याला जाणवतील. उदा. पालक आपल्या मुलांना मिठी मारतात तेव्हा त्यांना मिळणारी सुखानुभूती आत्म्याची असते. असे आत्म्याचे काही शब्द अगदी शांतपणे बसून ऐका. आपण आत्म्याचे ऐकत असताना सर्व विचार थांबले पाहिजेत. थोडा वेळ बाहेरच्या जगापासून दूर जावे. मग आपल्याला असे काही ऐकायला मिळेल, जे खरे ज्ञान आहे. जग माहितीसाठी वेडे होत असताना, माहितीसाठी मेहनत केली जात असताना आपण ज्ञानासाठी थोडा वेळ का काढू नये?

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...