आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामि त्र, म्हणजे असा सहकारी ज्याच्यावर तुमचा विश्वास असतो की, तो तुम्हाला जे सांगेल ते खरे असेल. तो तुम्हाला जो काही सल्ला देईल योग्यच देईल. काही अडचण आली तर तो तुम्हाला साथ देईल. आणि हा आत्मविश्वास यायला खूप वेळ लागतो. पण आजकालचा तरुण काल भेटलेल्या माणसांवर विश्वास ठेवतो. त्यांना सर्वांत जवळचा मित्र बनवताे. नवीन मित्र बनवणे चांगले आहे, परंतु प्रत्येक जण ‘जवळचा’ मित्र असू शकत नाही. विशेषत: मैत्री होऊन ज्याला सहा महिनेदेखील झाले नाहीत. आणि या घाईमुळे कधीकधी अनुचित किंवा फसवणुकीच्या घटना घडतात. आजच्या लेखात आपण अशाच मैत्रीबद्दल बोलणार आहोत. वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांना भेटतो कधी मित्राच्या माध्यमातून नवीन माणसे जोडली जातात, तर कधी ओळखीची व्यक्ती मित्र बनते. कधीकधी आपण अशा लोकांशी मैत्री करतो ज्यांच्याशी आपला संबंधही नसतो, जसे की एखाद्या मित्राच्या भावाचा मित्र. कामाच्या संदर्भात भेटी देखील होतात, त्याचे मैत्रीमध्ये रूपांतर होऊ शकते. महत्त्वाचा प्रश्न... मित्रांबद्दल किती माहिती? नवीन मित्र बनवताना त्याची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी तपासून घ्या. तो कुठला आहे आणि त्याने कुठून शिक्षण घेतले आहे, याची माहिती पाहिजे. तो / ती इथे एकटा राहतो की त्याचे कुटुंब आहे? असल्यास कुटुंबालाही भेटा. काम करत असल्यास, तो / ती कुठे काम करतो? तो / ती हे सर्व सांगण्यास टाळाटाळ करीत असेल किंवा विचारल्यावर विषय बदलत असेल, तर कुठेतरी तो / ती आपली ओळख लपवत असते. अशा परिस्थितीत त्यांच्यापासून लांबच राहावे.
आपल्या कुटुंबाला किती माहिती आहे? आजकाल तरूण रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत बाहेर फिरतात, पार्टी करतात. तुम्ही ज्या मित्रासोबत जात आहात त्याच्याबद्दल तुमच्या कुटुंबाला माहिती आहे का? ते त्यांना कधी भेटले आहेत का? त्यांचा तुमच्यासाठीचा उद्देश काय, हे तुम्हाला माहीत नाही. कदाचित तुमच्या दोघांचा अपघात झाला, तर तुम्हाला मदत करण्याऐवजी तो रस्त्यावर सोडून त्याच्या घरी जाईल. किंवा कदाचित तो तुम्हालाच दोष देईल. तुम्ही ज्यांना भेटत राहता, वेळ घालवता किंवा अनेकदा बाहेर जाता, अशा जुन्या किंवा नवीन मित्रांची माहिती कुटुंबाला असली पाहिजे. त्यांची कुटुंबाशी ओळख करून द्या. तुम्ही कामासाठी जात असाल तर घरच्यांना त्याबद्दल सांगा, म्हणजे त्यांना कळेल की तुम्ही कुठे आहात आणि कोणासोबत आहात. सोबत जाण्यापूर्वी दोनदा विचार करा... मुलांमध्ये प्रसिद्ध होण्याची किंवा झटपट पैसे मिळवण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यांना असे वाटते की काही छोटीमोठी कामे करून आपण पैसे कमवू शकतो. अशा परिस्थितीत अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात ते अगदी सहज अडकतात. विशेषत: एकाच व्यवसायात असताना अशी शक्यता अधिक असते. एखाद्या कार्यक्रमात किंवा शोमध्ये कामाच्या बदल्यात काही रक्कम देण्याचे आश्वासन कोणीतरी अनोळखी व्यक्ती देते तेव्हा तरुण विचार न करता त्याच्यासोबत जातात. कधी कधी कुठेही फिरायला जातात. इथे मुलांबरोबरच पालकांनीही लक्ष द्यायला हवे की, बेताच्या आर्थिक परिस्थितीचा मुलांवर परिणाम तर होत नाही ना? आर्थिक परिस्थिती चांगली नसेल आणि मुलाला आत्तापासून करिअर करायचे असेल तर त्याचे माध्यम योग्य असावे, हे ध्यानात ठेवा. तो कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, याची माहिती घेत राहा.
मैत्री केली असेल, तर जरा लक्ष ठेवा तुम्ही नुकतीच मैत्री केलेल्या व्यक्तीचे वागणे आणि सवयी बरेच काही सांगून जातात. एखाद्या मित्रासोबत वेळ घालवल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या थकून जात असाल किंवा खचून जात असाल तर कदाचित तुम्हाला ही मैत्री ठेवावी की नाही, याचा पुन्हा विचार केला पाहिजे. एक वाईट मित्र सुरूवातीला अत्यंत भरवशाचा आणि चांगला असण्याचा दिखावा करू शकतो, परंतु वेळोवेळी त्याचा हेवा आणि स्वार्थ दिसून येतो, म्हणून त्याच्या वागण्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्वत:चे काम
तुमच्याकडून करून घेतो, परंतु तुमची वेळ येते तेव्हा तो वेगवेगळी कारणं सांगू शकतो. तुमच्या यशाचा त्याला हेवा वाटू शकतो. तुमच्या समोर तुमची स्तुती करू शकतो, परंतु पाठीमागे वाईट बोलू शकतो. तुमच्या दु:ख आणि त्रासाकडे दुर्लक्ष करू शकतो. गमतीने बोलतो आहे, असे सांगून वारंवार अपमान करू शकतो. तुम्हाला बदलवण्याचा आणि धाकात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. तुमचे निर्णयही तो स्वत: घेऊ शकतो. खोटं बोलण्यासाठी सांगू शकतो. स्वत:ची चूक मान्य करत नाही आणि तीच चूक वारंवार करत राहतो. तुमचे कर्तृत्व खुजे दाखवतो, तुमचे बोलणे मध्येच थांबवतो आणि स्वतःबद्दल बोलतो.
विश्वास ठेवण्यापूर्वी पारखून घ्या कोणी मित्र म्हणून नोकरी किंवा काम करण्याचे वचन देत असेल किंवा तुमच्याशी मैत्री करू इच्छित असेल तर अशा व्यक्तीस, पारखून घ्या. त्याला घरी नाश्त्यासाठी बाेलवा. ती व्यक्ती योग्य असेल तर घरी येईल आणि कुटुंबालाही भेटेल. त्याने घरी येण्यास नकार दिला तर त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. कोणी मित्र म्हणून मदत करण्याचे वचन दिले, तर तो तुम्हाला कधीही चुकीचा सल्ला देणार नाही. तुम्ही काही चुकीचे केले तरी तो तुम्हाला योग्य दिशा देईल आणि हीच खऱ्या मित्राची ओळख अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.