आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या इतर भागांप्रमाणेच या गावातील वातावरणात ८ मार्च रोजी रंगत येणार आहे. ढोलावर थाप घुमणार, हवेत पक्वान्नांचा सुवास येईल. महाराष्ट्रात कोल्हापूरपासून २०० किमीवरील माणगावात हे सर्व घडेल. परंतु येथील सायंकाळ अनोखी असेल. येथे एक नियम लागू होईल, ज्याचे पालन ३० हजार घरांत राहणारे १.६ लाख लोकांना करावे लागेल. पुरुषांपेक्षा महिलांची लोकसंख्या जास्त असलेल्या देशातील गावांमध्ये माणगावचा समावेश आहे. सुरुवातीला हा नियम ऐच्छिक असून प्रत्येक कुटुंबाला पाच संधी दिल्या जातील. त्यानंतर ग्रामपंचायत पालन न करणाऱ्यावर मालमत्ता कर वाढवून दंड वसूल करेल. पण हा नियम काय आहेॽ तो संपूर्ण देशात लागू केला तर समाजाला खूप फायदा होऊ शकतो. हा नियम आहे, ‘काळाची गरज ज़रूरत.’ गॅजेट व्यसनाच्या विरोधात हा नियम लागू करण्याचा निर्णय २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीने एकमताने घेतला होता. नियमानुसार सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सर्व जण मोबाइल फोन, टीव्ही बंद ठेवतील आणि पुस्तक वाचण्यासह कुटुंबातील सदस्यांसोबत बोलण्याच्या सवयीला चालना देतील. गावकऱ्यांना गॅझेटच्या व्यसनापासून सुटकेसाठी हा नियम सोपा वाटतो.
माणगावचे ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांनी २१ मार्च १९२० रोजी अस्पृश्यतेविरुद्ध निर्णय घेतला होता. विधवांवरील अत्याचाराची प्राचीन परंपरा खंडित करण्याचा प्रस्ताव आणण्यासाठीही हे गाव ओळखले जाते. या वर्षी ८ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय नवीन नियमाचे स्मरण करून देण्यासाठी तीन मिनिटे सायरन वाजवेल. पुढील दिवसही तो वाजत राहील. ग्रा.पं. सदस्य आणि स्वयंसेवक गावात फिरून पुस्तक वाचणे आणि कुटुंबीयांशी बोलण्याबाबत प्रचार करतील. केबलचालकाला आधीच प्रसारण थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या घरांत डीटीएच कनेक्शन आहेत, त्यांना नियम पाळण्यास सांगण्यात आले. तथापि गावात महिला जास्त आहेत. त्या मुलांच्या भविष्याबाबत जास्त चिंतीत असतात. त्यामुळे सरपंच राजू मगदम यांना होळीला चांगली सुरुवात होईल, असा विश्वास आहे. कायझन, ज्याचा अर्थ चांगला बदल असा होतो. वाईट सवयींतून मुक्त होण्याचा एक उपयुक्त मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. ही सवयी बदलण्याची जपानी विधी आहे. एका वेळी एक पाऊल.. यात एका वेळी मोठा बदल करण्याऐवजी लहान पावले उचलली जातात. त्यामुळे सवय पूर्णपणे बदलते. जर तुम्हाला वाटत असेल फोनमुळे तुमचे नाते हानीकारक झाले असेल तर उदाहरण म्हणून तुम्ही सोशल मीडिया अॅप डिलीट करण्यापासून सुरुवात करू शकता किंवा ते केवळ डेस्कटॉपवर वापरण्याचा नियम बनवू शकता. जर असे करणे मोठे पाऊल वाटत असेल तर ते अॅप हिडन फोल्डरमध्ये ठेवा, म्हणजे ते होम स्क्रिनवर दिसणार नाही. अशाच प्रकारे जपानी विधी शिनरिनयोकू (वन स्नान) स्वत:ला निसर्गाशी सुसंगत करण्याची पद्धती आहे. यात सर्वच इंद्रिय वापरले जातात. जसे की पानांची सळसळ ऐकणे, मातीचा गंध घेणे. यामुळे तणाव कमी आणि मूड चांगला होतो.
फंडा असा की, जर जीवनात रंगीत काहीतरी मिळवायचे असेल तर ‘काळ्या-पांढऱ्या’ मार्गाने जा आणि रंगांचा आनंद कसा लुटता येईल ते पहा. तुम्हा सर्वांना होळीच्या आगाऊ शुभेच्छा!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.