आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:विरोधी ऐक्यासाठी अनेक स्वार्थ सोडावे लागतील

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाज असो वा संघटना, परिस्थितीनुसार एकत्र येण्याचे प्रयत्न असोत किंवा सत्ता मिळवण्यासाठी आघाड्या असोत, त्याचा आधार ‘काही मिळवण्यासाठी काही सोडणे’ हे तत्त्व आहे. अशा स्थितीत विरोधकांना आपले अस्तित्व वाचवायचे असेल तर त्यांना संघटित होऊन सध्याच्या सत्ताधाऱ्यांशी लढावे लागेल. काँग्रेस पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी मैदानात उतरली आहे, तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पण, मूळ प्रश्न हा आहे की काँग्रेसशिवाय (ज्याला आजही १२ कोटी मते मिळतात) विरोधी पक्ष केंद्रात येऊ शकतो का? काँग्रेस आणि भाजप वगळता भारतातील सर्व पक्ष हे मुळात प्रादेशिक पक्ष आहेत. पर्याय म्हणून कोणता नेता देशाचे नेतृत्व करेल आणि त्याच्यावर विश्वास ठेवता येईल का, हे कळल्यावरच भाजपविरुद्धच्या लढाईवर लोकांचा विश्वास बसू शकतो.

तिसरी आघाडी आज शक्य नाही. देवेगौडा किंवा गुजराल भले पंतप्रधान झाले असतील, पण राष्ट्रीय नेते म्हणून त्यांना कधीच जनतेचा आशीर्वाद मिळाला नाही. भारत जोडो यात्रा, महागाई या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यास लोकांचा काँग्रेसवरील विश्वास वाढेल, हे खरे आहे, पण किती? आणि पश्चिम बंगाल, पंजाब किंवा दक्षिणेतील राज्यांतील सत्ताधारी पक्ष काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारतील का? त्यावर विधानसभा निवडणुकांत प्रादेशिक पक्षांना काँग्रेसने प्राधान्य देणे आणि त्या बदल्यात सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला जागा सोडणे, हा एकच उपाय आहे. तरीही विरोधी आघाडीतील काही पक्ष काँग्रेसचे नेतृत्व अमान्य करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत एनडीएच्या निमंत्रकांच्या (फर्नांडिस, शरद यादव व चंद्राबाबू) धर्तीवर बिगर-काँग्रेस नेत्याला आघाडीचे समन्वयक करता येईल. अशा बलिदानासाठी काँग्रेसला तयार राहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...