आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार:कदाचित मंदीच्या दिशेने तर जात नाही ना बाजार? ;  अर्थव्यवस्था मंदावल्यास किरकोळ गुंतवणूकदारांचे मनोधैर्यही अखेरीस खचेल

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन शेअर्स २० टक्के घसरले आहेत. १९७० नंतरची ही सर्वात वाईट वर्षाची सुरुवात आहे. हे नाटक कसे संपेल, असा विचार अनेक जण करत आहेत. तथापि, आता कुठे मध्यंतर झाले, चित्रपट अजून बाकी आहे, असे माझे मत आहे. निदान भूतकाळाचा नमुना तरी असेच सुचवतो. अमेरिकन स्टॉक मार्केट इंडेक्स, एस. अँड पी. ५०० चा १९२६ पर्यंतचा रेकॉर्ड, १५ महिन्यांत ३४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवलेल्या एकूण १५ बिअर-मार्केटचा संदर्भ देते (त्याच्या शेवटच्या पीकवरून २० टक्के किंवा अधिक घसरलेला बाजार). यापैकी ११ प्रकरणे अशी होती, ज्यात बाजार १५ ते २० टक्क्यांनी घसरल्यानंतर काही काळ विक्री थांबली आणि नंतर घसरणीचा कल कायम राहिला. हा इतिहास सांगतो की, आपण अजूनही बिअर-मार्केट इंटर्व्हलमध्ये आहोत. इतर काही घटकदेखील हेच सुचवतात. भूतकाळातील बिअर-मार्केटदेखील काही काळ स्तब्ध होते, याचा अर्थ असा नाही की घसरण थांबली आहे. स्तब्ध झालेल्या ११ बिअर-मार्केटमध्ये सरासरी चार महिन्यांचा कालावधी होता. पण या वेळी फेडरल रिझर्व्ह बाजाराला मदत करण्यासाठी पुढे येणार नाही. किमान व्याजदर महागाईच्या दरापेक्षा कमी राहतात तेव्हा तरी नाही. बाजारात घसरण कशी सुरू झाली? फेड टायटनिंगपासून. मध्यवर्ती बँका फेडरल फंड दर वाढवतात तेव्हा हे घडते. हे एका युगाच्या समाप्तीची घोषणा करते असे मानले जात होते. आता चलनवाढ सातत्याने होत आहे, फेड गुंतवणूकदारांना तितकी आशा देऊ शकत नाही जितकी ती तीन दशकांपासून देत आहे. बाजार बिअर-टेरिटरी असतो तेव्हा त्याची घसरण थांबवण्यासाठी फेड काहीही करू शकत नाही. १९२६ पासून बाजार २०% नी घसरल्याचे पाच प्रसंग आले आहेत, परंतु ते बिअर-मार्केट नसल्याने तो घसरला नाही. या पाचही प्रसंगी फेडरल रिझर्व्हने हस्तक्षेप केल्यावरच बाजारातील घसरण थांबली. यासाठी त्यांनी आपले आर्थिक धोरण शिथिल केले. त्यापैकी १९९० ते २०१८ या काळात इझी-मनीच्या काळात चार घटना घडल्या. पण जोपर्यंत अर्थव्यवस्था मंदीत जात नाही आणि महागाईचे वारे सुटत नाहीत तोपर्यंत आता फेडरल रिझर्व्हला बाजार उचलता येण्याची शक्यता कमीच आहे. पण, मंदी ही बाजारासाठी मोठी समस्या ठरेल. ग्राहकांचा आत्मविश्वास कमी होत असल्याने आणि इतर निर्देशकदेखील सूचित करत असल्याने मंदीची शक्यता वाढत आहे. अलीकडच्या दशकांमध्ये अर्थव्यवस्थेला झपाट्याने वित्तपुरवठा केला गेला आहे आणि फेडरल रिझर्व्हने वारंवार बेल आउट केले आहे, त्यामुळे बिअर-मार्केटसारखी परिस्थिती क्वचितच निर्माण होऊ शकते. पण जेव्हा जेव्हा हे घडले तेव्हा त्याने गंभीर परिस्थिती निर्माण केली आणि शेवटी त्याने मंदी आणली. १५ बिअर-मार्केटपैकी ११ बाजार मंदीच्या स्थितीत होते. यामध्येही १९७० पासून आतापर्यंत सहा वेळा असे घडले आहे. बिअर-मार्केट इंटरमिशनसाठी मध्ये यासाठी थांबतात, कारण बाजारात सरळ रेषा नसतात आणि गुंतवणुकीची मानसिकता मोडण्यास वेळ लागतो. आज अनेक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांचे होल्डिंग स्टॉकमध्ये कमी केले आहे, परंतु किरकोळ गुंतवणूकदारांवर अद्याप परिणाम झालेला नाही. एप्रिलमध्ये खासगी गुंतवणूकदारांनी अमेरिकन स्टॉक्स आणि एक्सचेंजमध्ये विक्रमी वेगाने पैसे ओतले - महिन्याला २० ते ३० अब्ज डाॅलरपर्यंत. आतापर्यंत समभागाचे मूल्यांकन खाली आले आहे, कारण स्थिर कमाई असूनही किमती घसरत आहेत. यावर्षी बाजार घसरला असला तरी चांगल्या कमाईच्या आशावादी-ट्रेंडने घसरणारा शेअर खरेदी करण्याची मानसिकता कायम ठेवली आहे. पण अर्थव्यवस्था मंदावताच किरकोळ गुंतवणूकदारांचे मनोधैर्य खच्ची होईल. बुल नावाचे आशावादी खरेदीदार १९९४ सालाकडे निर्देश करतात. ते म्हणतात की, तेव्हा अर्थव्यवस्था इतकी मजबूत होती की फेड-टायटनिंग असूनही थोडी मंदी आली आणि स्टॉक फक्त दहा टक्क्यांनी घसरला. ते असेही म्हणतात की, महागाई कमी होईल आणि युद्ध व महामारीच्या परिस्थितीचा अंत होईल, फेड-टायटनिंग लवकरच थांबेल. पण, बिअर-मार्केटचा इतिहास वेगळीच कथा सांगतो. बघूया, पुढे काय होते ते.

बुल म्हणवले जाणारे आशावादी खरेदीदार म्हणतात की, महागाई कमी होईल आणि युद्ध व महामारीची परिस्थिती संपेल, परंतु बिअर-मार्केटचा इतिहास वेगळीच कथा सांगतो. पुढे काय होते ते बघूया.

रुचिर शर्मा ग्लोबल इन्व्हेस्टर व बेस्टसेलिंग रायटर breakoutnations@gmail.com

बातम्या आणखी आहेत...