आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • McDonald's Earns More From Real Estate, Not Burgers, Sales Centers In 119 Countries

ब्रँडच्या यशाची कहाणी - मॅकडोनाल्ड:बर्गर नव्हे, रिअल इस्टेटमधून मॅकडोनाल्डची अधिक कमाई,119 देशांमध्ये विक्री केंद्रे

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅकडोनाल्ड हे नाव ऐकल्यावर सर्वप्रथम डोळ्यासमोर येईल बर्गर, फ्रेंच फ्राइज. परंतु, खाद्.पदार्थांपेक्षा भाड्यातून त्यांची जास्त कमाई होते, असे म्हटल्यास धक्का बसणे स्वाभाविक आहे. मॅकडोनाल्ड फास्ट फूड चेनने लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. आजही जगभरातील बिझनेस स्कूलमध्ये कॅलिफोर्नियाच्या या कंपनीने जगभर साम्राज्य कसे निर्माण केले हे शिकवले जाते. अमेरिकेत तर रुग्णालयांपेक्षा मॅकडोनाल्डची दुकाने अधिक आहेत. जगात दररोज ५ कोटींहून अधिक बर्गर विकले जातात. मॅकडोनाल्ड रणनीती बदलून मार्केटवर कसे राज्य करत आहे? चला जाणून घेऊया....

मॅकडोनाल्ड | फास्ट फूड चेन -स्थापना ः १९५५ -बाजारमूल्य ः ~ १५.४१ लाख कोटी

कथा : संस्थापक दोन भाऊ, उद्योजकाने निर्माण केला ब्रँड १९४० मध्ये मॅक-डिक या दोन भावांनी कॅलिफोर्नियामध्ये मॅकडोनाल्ड सुरू केले. सुरुवातीला ते बार्बेक्यू होते. नंतर बर्गर, फ्राइज, शीतपेये आणली. १९५४ मध्ये उद्योजक रे क्राॅक मॅकडोनाल्डमध्ये गेले. विस्तारत असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये क्रॉक यांना संधी दिसली. त्यांनी १९५५ मध्ये मॅकडोनाल्ड सिस्टिमची स्थापना करून १९६१ मध्ये मॅकडोनाल्डचे सर्व हक्क व त्यांची कार्यपद्धतीही विकत घेतली. मॅकडोनाल्डला जागतिक ब्रँड बनवण्याचे श्रेय क्रॉक यांना जाते. १९६१ मध्ये त्यांनी फ्रँचायझी व व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासाठी अनेक देशांत हॅम्बर्गर विद्यापीठे सुरू केली.

मॅकडोनाल्डचे ब्रँड निर्माते- रे क्रॉक (१९०२-१९८४) सीईओ, ख्रिस केम्पझिन्स्की (संपत्ती-१४३ कोटी ~) १५२ व्या क्रमांकावर कंपनी फाॅर्च्युन-५०० मध्ये २ लाख कर्मचारी काम करतात जगभरात

व्यवसाय : फ्रँचायझी मॉडेलवर ९३% रेस्टॉरंट, हाच उत्पन्नाचा स्रोत गतवर्षी मॅकडोनाल्डचा महसूल १.८३ लाख कोटी रु. होता. यामध्ये ५६% महसूल म्हणजे १ लाख कोटी रु. फ्रँचायझी रेस्टॉरंटमधून आला. उर्वरित महसूल कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंटमधून आला. मॅकडोनाल्डचे ११९ देशांमध्ये ४०,०३१ रेस्टॉरंट आहेत. यापैकी ९३% म्हणजे ३७,२९५ रेस्टॉरंट फ्रँचायझी मॉडेलवर काम करतात. फ्रँचायझी मॉडेलअंतर्गत व्यक्तिगत आउटलेटचे करार करून मॅकडोनाल्ड ती जागा विकत घेते. मग त्याच्या संचालन खर्चापासून भाड्यापर्यंत आउटलेट पैसे देते. या भाड्यातूनही मॅकडोनाल्डला भरपूर कमाई होते.

ब्रँडिंग : फ्रेंच फ्राइज बेस्ट सेलर, २ हजार शेतकऱ्यांशी करार फ्रेंच फ्राइज हे मॅकडोनाल्डचे सर्वात लोकप्रिय उत्पादन आहे. आणि जगभरातील आउटलेटमध्ये दररोज ४५०० टन फ्रेंच फ्राइज विकले जातात. उत्तर अमेरिकेत पिकणाऱ्या शेपाॅडी आणि रुसेट बरबँक यांसारख्या विशेष बटाट्यांपासूनही फ्राइज बनवल्या जातात. २०१८ मध्ये मॅकडोनाल्डने बर्गरमध्ये कृत्रिम फ्लेव्हर, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा रंग मिसळणे बंद केले. भारतातही त्याच्या बहुतांश उत्पादनांमध्ये कृत्रिम घटक नसतात. जगभरातील २,००० हून अधिक शेतकऱ्यांना मॅकडोनाल्डच्या गुड अॅग्रीकल्चर प्रॅक्टिस स्टँडर्ड््सचे प्रशिक्षण देण्यात आले.

धोरण : मंदीच्या काळातदेखील मॅकडोनाल्ड कमाईत राहते पुढे दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार, त्याची अमेरिकेतील विक्री ३.७%, तर जागतिक विक्रीही १०% वाढली. मंदीचा दबाव असूनही मॅकडोनाल्डच्या विक्री वाढीचे कारण ‘व्हॅल्यू परसेप्शन’ हे आहे. सोप्या अर्थाने, त्या उत्पादनाच्या दराबद्दल ग्राहकांचे मत काय आहे, यात तो प्रतिस्पर्धी उत्पादनांशी त्याची तुलनादेखील करतो. २००८ च्या मंदीतही ग्राहकांनी पूर्णवेळ रेस्टॉरंटमध्ये जाणे बंद केले होते, पण मॅकडोनाल्डच्या विक्रीवर फारसा परिणाम झाला नाही. किराणा मालात महागाई वाढूनही कंपनीला फायदा होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...