आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरं तर खताच्या अतिवापरामुळे जमिनीत क्षार वाढतात, ज्यामुळे रोपं मरतात किंवा सुकून जातात. अशा परिस्थितीत माती आणि रोपांसाठी पेंडेचा योग्य वापर फायदेशीर ठरू शकतो.
रोपांना पोषक घटक मिळण्यासाठी, फुलांची आणि फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी, कीटक आणि रोगांपासून रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठी पेंड खूप उपयुक्त ठरते. तिचा खत म्हणून वापर केला जाऊ शकतो. पेंडेमध्ये रोपांसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेंद्रिय कार्बन यासारखे अत्यंत पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात.
मोहरीची पेंड रोपांच्या वाढीसाठी मोहरीची पेंड अत्यंत आवश्यक मानली जाते. ती खत म्हणून जमिनीतही टाकता येते. फुलांच्या रोपांसाठी दर १५-२० दिवसांनी या पेंडेचा उपयोग केल्यास फुले आणि फळे लवकर येण्यास मदत होते. शिवाय, या वापरामुळे त्यांचा दर्जाही चांगला राहतो. पेंड वापरल्याने राेपांच्या मुळाशी बुरशी लागत नाही आणि झाडे निरोगी राहतात.
वापरण्याची पद्धत १०० ग्रॅम मोहरीची पेंड मातीच्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या बादलीत १ लिटर पाण्यात मिसळा आणि दोन-तीन दिवस तसेच ठेवा. पेंड विरघळल्यानंतर त्या मिश्रणाला ५ लिटर पाण्यात मिसळून द्रव स्वरूपात मातीत टाकून द्या. २० ग्रॅम मोहरी पेंडेची पावडर ५०० ग्रॅम सेंद्रिय खतात मिसळून वापरा. २०-२५ ग्रॅम मोहरीच्या पेंडेची पावडर मातीत मिसळा आणि कुंडीत एक इंचपर्यंत थर पसरवा. रोपाच्या वाढीत हे खताचे काम करेल.
भुईमुगाची पेंड भुईमुगाची पेंडही रोपांसाठी खूप फायदेशीर असते. ही पेंड जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण सुनिश्चित करते तसेच वनस्पतींमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित करते. ही पेंड सेंद्रिय खत म्हणूनही वापरली जाऊ शकते. वापरण्याची पद्धत एक लिटर पाण्यात भुईमुगाची पेंड टाका आणि २-३ दिवस तसेच राहू द्या. त्यानंतर हे द्रावण गाळून २ लिटर पाण्यात मिसळून मातीत टाकून द्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.