आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:गरीब-श्रीमंत दरी कमी करण्याचे उपाय करावेत

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, कोरोनाच्या काळात भारतातील ८४% लोकांचे उत्पन्न घटले आहे. सीएमआयईने ताज्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत बेरोजगारी इतकी वाढली आहे की, कामाच्या वयातील ४५ कोटी लोकांनी नोकरी सोडली आणि गावी परतले. पण आणखी दोन तत्सम अहवाल ‘उगवत्या’ भारताचे वेगळे चित्र रंगवतात. एका अभ्यासानुसार, परकीय भांडवली गुंतवणूकदारांच्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांनी कोरोनाच्या काळात नोंदणीकृत कंपन्यांमध्ये विक्रमी गुंतवणूक केली. परकीय गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून घेत असताना भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांचा मोठा वर्ग बाजारात गुंतवणूक करत होता.

सेबीच्या मते, खासगी रिटेल गुंतवणूकदारांच्या (८९.७ कोटी) डिमॅट खात्यांची संख्या गेल्या दोन वर्षांत दुप्पट झाली. म्हणजे लाखो बेरोजगार कामगार लॉकडाऊनमध्ये गावाकडे परत जात होते किंवा उपचाराअभावी मरत होते त्या वेळी एक वर्ग डिमॅटद्वारे शेअर बाजारात पैसे गुंतवत होता. प्रश्न असा आहे की, रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळातील आर्थिक नुकसानीतून सावरायला देशाला १३ वर्षे लागतील, तर मग कोण आहेत हे लोक, ज्यांच्याकडे इतका पैसा आहे की शेअर बाजारही कमी पडतोय? मात्र, या एप्रिलमध्ये जीएसटी संकलन विक्रमी उच्चांकावर राहिल्याचा सरकारला आनंद आहे. या परस्परविरोधी वस्तुस्थिती लक्षात घेता गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी कमी करणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांची कौशल्यनिर्मिती हाच त्यांना रोजगार/उद्योजकतेसाठी तयार करण्याचा एकमेव मार्ग आहे.

बातम्या आणखी आहेत...