आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Medicine Baba: Distribution Of Crores Of Medicine In 17 Years| Positive Blog By Omkarnath Sharma

पाॅझिटिव्ह ब्लाॅग:मेडिसीन बाबा : 17 वर्षांत कोट्यवधींचे औषध वाटप

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वृद्धांचे जीवन औषधांवर अवलंबून असते, असा ८५ वर्षे हा वयाचा टप्पा आहे. पण, दिल्लीच्या ओंकारनाथ शर्मांनी आयुष्य औषधांसाठी वाहून घेतले आहे. गेली १७ वर्षे ओंकारनाथ म्हणजेच ‘मेडिसीन बाबा’ देशभरातील गरजू लोकांना औषधांचे मोफत वाटप करत आहेत. तुम्ही त्यांना देशातील कुठूनही प्रिस्क्रिप्शन पाठवा, ते तुमच्या घरी मोफत कुरिअरने औषध पोहोचवतील. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहारमधील शालेय पुस्तकांमध्ये मेडिसीन बाबांच्या जीवनाचा आणि कार्याचा उल्लेख आहे. जगातील ६५ हून अधिक मीडिया हाऊसने त्यांच्याबाबत छापले-दाखवले आहे. त्यांच्याबाबत त्यांच्यांच शब्दात वाचूया.

‘१७-१८ वर्षांपूर्वीची गोष्ट...त्या वेळी दिल्लीत मेट्रो लाइनचे काम चालू होते. अचानक खांबाचा एक भाग कोसळल्याने काही लोकांचा मृत्यू झाला, तर काही लोक जखमी झाले. त्या आपत्कालीन परिस्थितीतही अत्यावश्यक औषधे नव्हती. डॉक्टरांनी सांगितले की, औषधे आणा, तरच उपचार होतील. त्या गरीब लोकांकडे औषधे घेण्यासाठी पैसे नव्हते. हे सर्व पाहून मन अस्वस्थ झाले आणि ठरवले की, आता कोणाला औषधांअभावी उपचारापासून वंचित राहावे लागू नये. मग औषधांसाठी लोकांकडे भिक्षा मागू लागलो. लोकांचे हित होत असेल तर याचक होण्यात लाज कसली? प्रत्येकाच्या घरात औषधांचा साठा नक्कीच असतो. अनेक औषधे कालबाह्य होऊन पडून राहतात, माझे एकच उद्दिष्ट आहे की, ते काही गरजूंना उपयोगी पडतील. दिल्लीत औषधे गोळा करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पेट्या ठेवल्या आहेत. दररोज तेथून औषधे गोळा करून उत्तमनगर येथे आणली जातात. औषधांसाठी गोदामही आहे. मेडिसीन बाबा फाउंडेशन या नावाने संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. मला औषधाची काहीही पार्श्वभूमी नसल्यामुळे फार्मासिस्ट औषधांची क्रमवारी लावतात आणि नंतर श्रेणीनुसार त्यांची विभागणी करतात. दररोज सकाळी दहा वाजल्यापासून औषधे घेणाऱ्यांची रांग असते. लोक डॉक्टरांनी लिहिलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन येतात आणि औषधे घेतात. हे काम करत आज १७ वर्षे झाली, आता मी ८५ टक्के अपंग आहे, पण हे काम अव्याहतपणे सुरू आहे. लोक ३ रुपये ते २ लाख रुपयांपर्यंतची औषधे दान करतात. भारताशिवाय फ्रान्स, व्हिएतनाम, इंग्लंड, कॅनडा या देशांत औषधे दान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी सरासरी दीड कोटी रुपयांची औषधे आमच्याकडे येतात, ती आम्ही गरजूंना वितरित करतो. तुम्हालाही हवे असल्यास ९२५०२४३२९८ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन पाठवून औषधे मागवू शकता. - फोनवरील संभाषणावर आधारित

-ओंकारनाथ शर्मा, दिल्ली, चेंजमेकर

बातम्या आणखी आहेत...