आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:मानसिक तत्त्वज्ञान हा व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा मंत्र

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फंडा असा आपल्या मानसिक तत्त्वज्ञानावर लक्ष केंद्रित करा आणि मग ते तुमचे व्यक्तिमत्त्व कसे बनते ते पाहा.

काही पुरुष आणि मुले मैदानावर सायकल चालवत आहेत, त्यांच्या पत्नी किंवा आई त्यांना पाहत आहेत असे दृश्य तुम्ही पाहिले आहे का? काही लोकांनी असे दृश्य हॉटेलमध्ये पाहिले असेल. तेथे पाहुण्यांना सायकल दिली जाते. जयपूरच्या लीला रिसॉर्टमध्येही मी असेच एक दृश्य पाहिले. त्यात काही महिलांना सायकल येत नव्हती, काहींना वजन जास्त असल्यामुळे पडण्याची भीती होती. महिला सायकल चालवण्यासाठी तयार नव्हत्या. त्यांचे पती आणि मुले त्यांना मदत करू पाहत होते. हे दृश्य पाहून मला कोरोनाकाळातील बंगळुरूचा प्रवास आठवला. तेथे मी ६५ वर्षांच्या डॉ. अली पूनावाला यांना पाहिले होते. ते बंगळुरूच्या बायसायकिलिंग स्कूलचे स्वयंसेवक डॉ. अली नाेकरदार महिलांना सायकल चालवणे शिकवत होते. तेथे कपड्याच्या अनेक कारखान्यांत महिला कमी पगारात काम करतात आणि खासगी गाडी घेऊ शकत नाहीत. त्या बस किंवा आॅटाे-व्हॅनवर अवलंबून असतात. महामारीच्या काळात सार्वजनिक वाहतूक चिंतेचा विषय होता. बऱ्याच महिला घर व काम दोन्ही सांभाळत होत्या. अशा वेळी वेळेत कारखान्यात पोहोचणे अवघड जात होते. उशिरा गेल्याने अर्ध्या दिवसाच्या पगाराचे नुकसान होत होते. त्यामुळे डॉ. पूनावाला यांनी स्वयंसेवकांसोबत मिळून अशा महिलांना सायकल शिकवली. आज बऱ्याच महिला सायकलने जातात. आता त्यांची संख्या वाढणार आहे. कारण ट्रेड युनियन त्यांच्या सदस्यांना स्वयंसेवक आणि ग्रीनपीससारख्या संस्थांच्या मदतीने सक्षम बनवत आहेत आणि त्यांना सायकल देत आहेत. या महिला दैनंदिन प्रवासात केवळ २० ते ४० रुपयांचीच बचत करत नाहीत तर बसची वाट पाहण्यात २० मिनिटांचीही बचत करत आहेत. या प्रक्रियेत त्या गेल्या सहा महिन्यांत अधिक तंदुरुस्त झाल्या आहेत. सायकल चालवणे हा केवळ कमी पगारांवाल्यांसाठी नव्हे, तर प्रत्येकासाठी आहे. त्यातून एक चांगला व्यायाम होतो, असे युरॉलॉजिस्ट डॉ. पूनावाला यांचे मत आहे.

एखाद्याला मस्कुलोस्केलेटल समस्या असल्यास सायकल चालवणे उपयुक्त ठरते आणि स्टॅमिना सुधारतो. जम्मूच्या २१ वर्षीय बाबा दानिश लँगरचे उदाहरण घ्या. तो नेहमी सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहत होता. २०१७ मध्ये लकवा आल्याने त्याच्या स्वप्नावर पाणी फिरले. व्हायरल किंवा बॅक्टेरिअल संक्रमणामुळे गिलियन बार सिंड्रोम (जीबीएस)मुळे त्याला लकवा झाला होता. त्याचा मुुख्य उपचार ब्लड ट्रान्सफ्युजन आहे, जे एक वर्षापर्यंत मोटार क्रियाकलापांवर परिणाम करते. त्याचे उपचार प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या रोगप्रतिकारक थेरपीने शक्य आहे. मृदसंधारण अधिकाऱ्याचा मुलगा दानिश सैन्यात भरती होण्याची इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षामुळे या परिस्थितीतून बाहेर पडला. सखोल फिजिओथेरपी, सायकलिंग, कठोर परिश्रमातून त्याने ध्येय गाठले. सैन्यात करिअर करण्यासाठी शरीर फिट झाले. शनिवारी तो इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी घेतल्यानंतर हवेत टोपी फेकताना उत्साहाने ओरडत होता. त्याच्या जागी दुसरे कोणी असते तर त्याने हार मानून नशिबाला शाप देत बसला असता. पण दानिशला माहीत होतं की, एक दिवस तो भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याचा गणवेश घालेल. तुम्ही जेव्हा मानसिक तत्त्वज्ञानाचा दीर्घकाळ सराव करता तेव्हा ते तुमच्या व्यक्तिमत्त्वात सामावले जाते. कालांतराने तुम्हाला मानसिक तत्त्वज्ञानावर लक्ष ठेवण्याची गरज पडत नाही. कारण ते तुमचे चारित्र्य बनते. मग जीवन तुम्हाला पुढील मानसिक तत्त्वज्ञानाची ओळख करून देते आणि हळूहळू ते विद्यमान मानसिक तत्त्वज्ञानाशी जोडले जाते.

मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन

बातम्या आणखी आहेत...