आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:पराक्रम म्हणजे शरीर, शौर्य म्हणजे आत्मा

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शौर्य व पराक्रम केवळ युद्धातच कामाला येत नाही. तसे पाहता मानवी जीवन हे एक युद्ध आहे. प्रत्येक क्षणाला बाहेरच्या परिस्थितीशी, माणसांशी व आतील वाईट गुणांशी लढावे लागते. हे निरंतर महाभारत आहे. म्हणूनच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शौर्य व पराक्रम अंगीकारला पाहिजे. एका युद्धात अर्जुन गर्विष्ठ झाला होता. अर्जुनाचा अहंकार राहू नये, अशी देवाची इच्छा होती. म्हणूनच त्याला मयूर ध्वजाकडे नेले. भगवंतांनी मयूर ध्वजाला अवयव दान म्हणून मागितले आणि मयूर ध्वजाने अवयव दिले ते पाहून अर्जुनाला धक्का बसला. तेव्हा देव म्हणाले, तू रणांगणाचे युद्ध लढलेस, तो जीवनयुद्ध लढतो आहे. जीवनात शौर्य व पराक्रम यांचा योग्य वापर केला पाहिजे, असे श्रीकृष्णाने शिकवले. पराक्रम प्रदर्शित होतो, शौर्य ही त्यामागची ताकद आहे. पराक्रमाला आपण शरीर म्हणू शकतो, शौर्य म्हणजे त्यातला आत्मा. उदा. महाभारताच्या युद्धात रथावर बसलेला अर्जुन पराक्रम होता, पण त्याच्यातील शौर्य श्रीकृष्ण होते. फक्त आपले शौर्य, पराक्रम शुभाशी संबंधित असावा, हे ध्यानात ठेवा. ते अशुभाशी संबंधित असतील तर तो गुन्हा ठरेल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...