आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्ही २० हजारांच्या कर्जास पात्र आहात आणि तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय काही मिनिटांतच मोबाइलवर काही स्टेप्स फाॅलो केल्यानंतर मिळेल, अशी जाहिरात तुम्ही माेबाइलवर पाहिली तर तुमच्यातील काही जण आनंदाने उड्या मारतील. त्या पैशांच्या वापराबद्दल तुम्हाला फक्त ४०० रुपये व्याजदर आठवड्याला द्यावे लागेल. जेवढे पाहिजेत तेवढे पैसे घेऊ शकता आणि त्या हिशेबाने व्याज कमी होईल. जाहिरातीने खुश होणारे लोक नशिबाला धन्यवाद देतील, त्यांना वाटेल की, सध्याच्या स्थितीतून एवढ्या सहजपणे बाहेर निघता येईल. आणि ते जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे मोबाइलवर त्या स्टेप्सचे पालन करतात. कर्जदात्याने व्याज आणि प्रक्रिया शुल्काची मोठी रक्कम आधीच कापून घेतलेली असते आणि सहाव्या दिवशी ग्राहकाला समज देणारा मेसेज येतो की, दुसऱ्या दिवशी पैसे भरा, मात्र त्याची फसवणूक झाल्याचे ग्राहकाच्या लक्षात येत नाही. या प्रक्रियेत जाहिरातदाराने आधीच त्याची सर्व संपर्क यादी आणि फोनमधील माहिती मिळवलेली असते, त्याला ते कळतच नाही. मूळ रक्कम चुकवण्यासाठी ग्राहक एक-दोन दिवसांची मुदत मागतो तेव्हा त्याला कर्ज देणाऱ्याचे खरे रूप पाहायला मिळते. कर्जदाता, ज्याच्याकडे कर्जदाराच्या सर्व नातेवाइक-मित्रांचे क्रमांक आधीच गेलेले असतात. ते त्यांना या व्यवहाराबाबत सांगतात आणि काही जण मोबाइलमध्ये काही फोटो माॅर्फ करून त्यांची बदनाम करण्याची धमकी देतात. यामुळे लोक आत्महत्येसारखे पाऊल टाकण्यास बाध्य होतात आणि मग भारतीय तपास संस्था या मागे असलेल्या लोकांचा शोध लावतात.
अशाच एका प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांना आढळले की, जवळपास ५०० अॅप्सचे सर्व्हर चीन, मकाऊ, हाँगकाँगमध्ये असून त्यात चिनी नागरिकांची भूमिका आहे. या साइट्सवर गुजरात आदी ठिकाणचे पत्ते खोटे आहेत. याेगायोगाने कर्जदारांना धमकावणारे कॉल सेंटर्स नेपाळमध्ये आहेत. दोन महिन्यांच्या चौकशीनंतर अखेर या आठवड्यात नेपाळ पोलिसांनी काठमांडू आणि रुपांदेहीमध्ये छापे टाकले. यात समजले की, हे सेंटर्स नेपाळी नागरिकतेद्वारे नोंदणीकृत असले तरी चिनी लोकांकडून चालवले जात होते. चौकशीत स्पष्ट झाले की, लहान कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या कमी उत्पन्न गटातील भारतीयांना लक्ष्य करण्याचे कॉल सेंटर्सना सांगण्यात आले होते. एक चिनी नागरिक हू युइहआ (४३), दोन भारतीय मनोज सैनी (२६) आणि नेहा गुप्ता (१९) तसेच ३३ नेपाळी नागरिकांना ३६२ लॅपटॉप्स आणि ७४८ डेस्कटॉपसह पकडले. पोलिसांना समजले, कर्मचाऱ्यांना ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जात होता आणि प्रत्येक वसुलीवर कमिशन वेगळे. त्यांचे चिनी संबंधाचे ठोस पुरावे आहेत, त्यांनी खूप आधी २०१८ मध्ये येथे आपले दुकान मांडले होते आणि कोरोनाच्या आधी परत आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मागे पुरावे न सोडणे आणि तपास संस्थांपासून वाचण्यासाठी आरोपी १० पेक्षा जास्त यूपीआय आयडी वापरायचे आणि रक्कम वेगाने एकीकडून दुसरीकडे ट्रान्सफर केल्यानंतर क्रिप्टोत बदलून चीनला पाठवत होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पोलिसांनी आंध्र प्रदेशातील सुधाकर रेड्डी (२५) चा शोध लावला, जो त्यांना कर्नाटकातील आणखी पाच जणांपर्यंत घेऊन गेला आणि नंतर गुरुग्राम, हरियाणा, मणीपूर, नैनीताल, मुंबईतील लोकांचा शोध लागला. गरिबांना लक्ष्य करून अडकवणाऱ्या काही चिनी नागरिकांविरोधात लूक आऊट नोटीस निघाली आहे.
एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.