आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • More Vocal And Democratic Opposition Parties Are Emerging| Articl Eby Shekhar Gupta

थेट भाष्य:उदयास येतोय अधिक बोलका आणि लोकवादी विरोधी पक्ष

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००९ पासून २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत भाजपने राष्ट्रीय मतांच्या वाटा जवळपास दुप्पट केला होता. सर्व पुरावे सांगत आहेत की, आज तो दुप्पट ताकदवान झाला आहे. दरम्यान, २०१७ पासून भारतीय अर्थव्यवस्था अडथळ्यांच्या अवस्थेत आहे, बेरोजगारी ऐतिहासिक उच्चांकावर आहे, महागाई शिगेला पोहोचली आहे आणि दोन वर्षांपासून आपण महामारीच्या वेदना सहन करत आहोत, तरीही भाजपचे मतदार विचलित झालेले नाहीत. ज्यांना तुम्ही ठोस हिंदुत्ववादी मतदार म्हणता तसे हे केवळ वचनबद्ध मतदार नाहीत. २००९ मध्येही त्यांनी भाजपला मतदान केले होते. हे असे नवे कोट्यवधी मतदार आहेत ज्यांना भाजपने नंतर आपल्या बाजूने खेचले आणि त्यांची बांधिलकी त्याच्याशी अढळ होऊ लागली आहे. वाढत्या बेरोजगारीपासून ते महागाईपर्यंत सर्व नकारात्मक गोष्टी ते स्वीकारतात, त्यांची हेटाळणी करतात, पण कोणाला मत देणार असे त्यांना विचारले की त्यांचे उत्तर हे असेल- भाजप. नरेंद्र मोदींना पर्याय कोण, याविषयी त्यांचे युक्तिवाद ऐकले, तर ते प्रवृत्तीच्या फारसे विरुद्ध वाटणार नाही. आपण राहुल गांधींना मत कसे देऊ शकतो, असा त्यांचा युक्तिवाद आहे. आणि पुन्हा ‘खिचडी युती’ कोणाला हवी आहे?

पण ‘कोणताही पर्याय नाही’ असे वाटते, त्यांना सांगावेसे वाटते की काही गोष्टी बदलू लागल्या आहेत. एक पर्याय उदयास येत आहे, पण तो भाजपचा नाही, तर काँग्रेसचा पर्याय आहे. मात्र, मोदी वर्चस्वाच्या या युगातही काँग्रेसने किमान मतांची टक्केवारी २० राखली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. २०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत आणि पुन्हा २०१९ मध्येही काँग्रेसची मते भाजप वगळता इतर पाच पक्षांच्या एकूण मतांपेक्षा जास्त होती. त्यामुळे भविष्यातील कोणत्याही भाजपविरोधी आघाडी किंवा आव्हानाची ती गुरुकिल्ली आहे. ती आपली व्होट बँक अबाधित ठेवेल तोपर्यंत इतर कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला मोदींना आव्हान देणे अशक्य आहे. युती असो वा प्रशांत किशोर यांच्याशी सामना, सत्तेसाठी सौदेबाजी करण्याची ताकदही त्यांनी काँग्रेसला दिली आहे. पण, तो आधार आता निसटत चालला आहे. काँग्रेससाठी ही वाईट बातमी आहे, पण भाजपसाठीही चांगली बातमी नाही. त्याच्या अपारंपरिक मतदारांकडे यापुढे ‘पर्याय नाही’ ही सबब राहणार नाही.

२०१४ च्या सुमारास ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते तेथेही काँग्रेसचा पराभव होऊ लागला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये सर्वात लक्षणीय पराभव झाले. पंजाबमध्ये नुकतेच काय झाले? काही प्रमाणात काँग्रेस ज्याला ‘आपले’ म्हणू शकत होती, तिथेही तिला पराभवाचा सामना करावा लागला, तोही भाजपचा आणखी एका ‘सेक्युलर’ प्रतिस्पर्धी ‘आप’च्या हातून. राष्ट्रीय पातळीवरील भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी दुखावला गेला. याचा फायदा असा झाला की, अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ यांच्या रूपाने एक नवा, अधिक गोंगाट करणारा, लोकप्रिय आणि आक्रमक प्रतिस्पर्धी उदयास आला. सुस्त काँग्रेसपेक्षा ‘आप’चे सरकार कसे वेगळे आव्हान बनले आहे, ते तेजिंदर बग्गा तमाशातून स्पष्ट होते.

हे फक्त ‘आप’बद्दल नाही. स्वीकारार्ह पर्याय असताना आपल्या निष्ठावंत मतदारांना टिकवून ठेवण्यात काँग्रेसची असमर्थता आहे. ते पर्याय म्हणजे आंध्रमध्ये जगन, तेलंगणमध्ये केसीआर, बंगालमध्ये टीएमसी आणि पंजाबमध्ये आप. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हरियाणा, आसाम, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात काँग्रेसला उल्लेखनीय जनाधार असल्याचे राजकीय नकाशावर नजर टाकल्यास स्पष्ट होईल. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण तिथे ‘आप’ची ताकद दिसून येईल. महाराष्ट्रात मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने ती पुढे सरसावत आहे. हरियाणात काँग्रेसच्या संघटनेत सतत अस्वस्थता आहे; राजस्थानमध्ये अंतर्गत असंतोष आहे आणि गुजरातमध्ये काय चालले आहे, हे कोणालाच माहीत नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...