आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:कृषी क्षेत्रात आता सर्वाधिक सुशिक्षित आणि संशोधकांची गरज

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील बहुतांश तरुण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर कमी शिकलेल्या लोकांसाठी हा व्यवसाय आहे, असे समजून हळूहळू शेतीपासून दूर जातात. पण, आता नाही. पुढच्या पिढीला हळूहळू हे समजू लागले आहे की, शेतीच्या व्यवसायाकडे कमीत कमी लक्ष दिले गेले आहे आणि त्यात भरपूर संधी आहेत. याचे काही पुरावे पाहा. मार्चमध्ये दिल्लीत झालेल्या जी-२० परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत नेदरलँडमधून १.३ लाख ट्युलिप बल्ब (फूल) आणले होते आणि परिसर सुगंधित करण्यासाठी एनडीएमसीभोवती लावले होते हे अनेकांच्या लक्षात आले असेल. आणखी ५ लाख ट्युलिप्स मागवण्यात येणार असल्याची चर्चा होती. हिमाचलच्या लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील मुदग्रान गावातील विक्रांत ठाकूर (२९) हे ट्युलिप वाढवण्याचं प्रशिक्षण घेतलेल्या २० शेतकऱ्यांपैकी आहेत. हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीच्या कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधून त्यांनी हे प्रशिक्षण घेतले. विक्रांत यांनी ट्युलिप्समध्ये संधी पाहिली आणि कुटुंबाच्या जमिनीवरील कोबी-कांद्याचे पीक सोडले. त्याऐवजी महागड्या ट्युलिप्सची फुलशेती करण्यासाठी त्यांनी आपली ऊर्जा लावली. या प्रक्रियेत त्यांच्या लक्षात आले की, फुलांना कीटकनाशकाची किंवा फवारणीची गरज नसते आणि एकदा लागवड केली की विशेष मेहनत लागत नाही. अटल बोगदा सुरू झाल्याने वाहतुकीचा खर्चही कमी झाला. त्यांचे ४०,००० ट्युलिप जूनमध्ये बाजारात येण्याची वाट पाहत आहेत, हा फुलांचा सामान्य हंगाम नाही आणि दिल्लीत त्यांना १०० रुपये प्रति फूल भाव मिळणे अपेक्षित आहे. या खरीप पिकाची पेरणी जून ते ऑक्टोबरदरम्यान होत असली तरी कोल्हापूरच्या डोंगराळ भागातील १५ हून अधिक शेतकऱ्यांनी जानेवारी ते मेदरम्यान नाचणी पिकवण्याचा निर्णय घेतला. २०१८ मधील त्यांचा प्रयोग अनोखा होता, कारण कृषी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना हे उन्हाळी पीक म्हणून पिकवायला शिकवले नाही किंवा पीक यशस्वी झाल्याची साक्ष देणारा डेटा त्यांच्याकडे नव्हता. पन्हाळा तालुक्यातील पिस्तारी गावातील शेतकरी मिलिंद पाटील हे त्यांच्या नेत्यांमध्ये होते. ते जे करणार होते त्याला ‘इतिहासाचा पहिला ढोबळ आराखडा’ मानत होते, असे त्यांनी वहीत नोंदवले. उन्हाळ्यात व्हाइट ग्रबचा प्रादुर्भाव होत नसल्याचेही त्यांना समजले. याशिवाय अशा प्रकारे पिकवलेली नाचणी पौष्टिक असते, ती आता थेट ग्राहकांना चढ्या दराने विकण्यासाठी कोल्हापूरच्या मिलेट्स असोसिएशनच्या माध्यमातून मार्केटिंग करत आहेत. बियाण्यांची खरेदी व्यवस्थापित करणे, भविष्यातील मागणी दर्शवणारी बाजारपेठ ओळखणे आणि मालवाहतुकीची व्यवस्था करणे, हे केल्यास तरुणांसाठी शेतीत सुवर्णसंधी आहेत, यात शंका नाही. असे केल्याने ते उत्पादन देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पाठवून चांगली किंमत मिळवू शकतात. शेती हा आगामी काळात झपाट्याने वाढणारा उद्योग आहे. फंडा असा की, त्याच जमिनीतून अधिक पीक घेण्याचा दबाव असल्याने कृषी क्षेत्रात सर्वात सुशिक्षित आणि संशोधकांची गरज आहे. ते केवळ मानवच नव्हे, तर इतर प्रजातींच्या वाढत्या लोकसंख्येलाही पोसण्यासाठी प्रयोग करण्यासह उपाय शोधू शकेल.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]