आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रिय जॉन्स्टन,
आयुष्यात अनेकदा मी तुझी मदत केली, मात्र काही काळानंतर मी तुला त्याच अवघड स्थितीत पाहतो. याचे काय कारण असू शकते? तू नक्कीच आळशी नाही, मात्र तू निष्क्रिय नक्कीच आहेस. आपल्या शेवटच्या भेटीनंतर तू बहुतेकच पूर्ण दिवस काम केले असेल. असे नाही की तुला काम करणे पसंत नाही तरीही तू जास्त काम करत नाही. कारण तुला नाही वाटत की यातून तू जास्त काही मिळवू शकतो. समस्येचे मूळ आहे की विनाकारण वेळ वाया घालवण्याची सवय. हे तुझ्या व तुझ्या मुलांसाठी खूप आवश्यक आहे की, तू ही सवय सोडावी. तुला पैशांची गरज आहे ना? एक काम कर, एखाद्या अशा व्यक्तीकडे जा, जी तुला पैसे देऊ शकते आणि त्यासाठी पूर्ण कष्टाने काम कर. घराचे काम वडील आणि मुलांना सोपवून दे. तुझ्या डोक्यावर जे कर्ज आहे ते फेड. एक ऐक, मी आश्वासन देतो. आज आणि एक मेच्या दरम्यान तू कमावलेल्या प्रत्येक डॉलरच्या मोबदल्यात मी तुला माझ्याकडून एक डॉलर बक्षीस देईन. समजून घे, जर मी तुला अशा प्रकारे दहा डॉलर उसने दिले तर त्या बदल्यात तूही दहा डॉलर कमावून घेशील. मग बघ, तू केवळ तुझे सर्व कर्जच फेडणार नाही तर एक अशी सवय लावून घेशील, ज्यामुळे तू पुन्हा कधी कर्जाच्या जाळ्यात फसणार नाही. सस्नेह. तुझा मोठा भाऊ, अब्राहम लिंकन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.