आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Movies Are Getting Closer To The Truth In Portraying The Characters| Article By Kaweri Bamjai

दृष्टिकोन:पात्रांच्या चित्रणात सत्याच्या जवळ जात आहेत चित्रपट

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘त्यांना फक्त घरी यायचे, टीव्ही पाहायचा, चिकन शिजवायचे, दारू प्यायची आणि नशेत जावेद अख्तर ऐकायचे असतात’, सोनी लाइव्हवरील ‘गुल्लक’ सीझन ३ मध्ये संतोष मिश्राची पत्नी म्हणते, त्यावर तिचा मुलगा तिची चूक सुधारत म्हणतो, ‘मम्मी, जावेद अख्तर नाही, बेगम अख्तर.’ त्यावर आई शांती मिश्रा उत्तर देते, ‘हो, मग बहीण असेल.’ हे वर्णन एका सामान्य मध्यमवर्गीय वडिलांचे आहे. आता कुठे चित्रपट आणि वेब सिरीजच्या दुनियेत मध्यमवर्गीय बापाचे चांगले-वाईट सगळे चित्रण केले जात आहे. मनोज पाहवा हे डिस्ने प्लस हॉटस्टारवरील ‘होम शांती’ या नवीन मालिकेत उमेश जोशी नावाच्या अशाच एका सामान्य वडिलांच्या भूमिकेत आहेत, तो एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या स्वतःचे घर बनवण्याच्या उत्कटतेवर केंद्रित आहे. पण, नेहमीच असे होत नव्हते. मध्यमवर्गीय वडिलांना बॉलीवूडच्या कुटुंबांमध्ये एक अलिप्त व्यक्ती म्हणून चित्रित केले गेले होते. सहसा त्यांना इमोशनल कार्डबोर्डप्रमाणे प्रदर्शित केले जात असे, उदा. ‘हम आपके है कौन’मधील त्याग करणारे काका किंवा ‘कभी खुशी कभी गम’मधील प्रदर्शनप्रिय श्रीमंत. आतापर्यंत जे स्थान सिनेमाच्या पडद्यावर आईला मिळायचे, ते आता वडिलांनाही मिळू लागले आहे. ‘होय, मी मदर इंडिया आहे, मलाही मन आहे’, असे ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चित्रपटात गजराज रावच्या पत्नीची भूमिका साकारणारी नीना गुप्ता म्हणते, त्याला ते उत्तर देतात, ‘आणि बाप तर बॅटरीवरच चालतो ना?’

पण आता हिंदी चित्रपट आणि मालिकांतील वडील बॅटरीवर चालत नाहीत. ते आता एक वास्तविक व्यक्ती म्हणून चित्रित केले जातात, त्यांच्या नसांमधून खरे रक्त वाहते, त्यांना आशा आणि निराशा आहे, त्यांना प्रेम करणे आणि कधी कधी रागावणेही येते. अगदी राजकीय भाष्यकार आणि आपली जागा आपल्या मुलाने घ्यावी अशी इच्छा असलेल्या ‘गुल्लक’च्या संतोष मिश्रांसारखे. किंवा ‘होम शांती’च्या उमेश जोशींसारखे, त्यांच्यात परफाॅर्मन्स एंग्झायटी इतकी आहे की, स्टेजवरून कविता ऐकवण्यासाठी त्यांना आदर्श व्यक्तीद्वारे तयार केले जाते. ते प्रामाणिकपणा, विश्वास आणि शेजाऱ्यांचे समर्थन या मध्यमवर्गीय मूल्यांनुसार जगण्याचा प्रयत्न करतात, परंतु अनेकदा पासवर्ड विसरतात. पत्नी आणि मुलगी त्यांना बोटांवर नाचवतात. किंवा ऋषी कपूरच्या ‘शर्माजी नमकीन’ या शेवटच्या चित्रपटाचे उदाहरण घ्या, त्यात कुटुंबातील मोठा मुलगा वडिलांच्या स्वयंपाकाची चेष्टा करतो. त्याचे वडील दिल्लीच्या सुभाषनगरमधील एका मोडकळीस आलेल्या घरात राहतात व जीवनात चांगले संबंध जोडू शकले नाहीत, हेदेखील त्याला आवडत नाही. तो रागाने बायकोला म्हणतो, ‘हे कुटुंब नाही, आजार झालाय, आयुष्यभर ऐकत राहा. तुला योग्य वाटते ते कर.’

मग वाटते, ज्यांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी काम केले, पण आता कुटुंबाला त्यांची गरजच उरली नाही, अशा तमाम मध्यमवर्गीय वडिलांचा जणू ते आवाज बनले आहेत. ते एका मित्राला म्हणतात, ‘माझ्यासाठी कोण काय करतंय, एखादे बिल भरायेच असल्याशिवाय माझी कुणाला आठवण येत नाही. वाढदिवसाच्या दिवशी केक भरवला की, झाले कर्तव्य.’ त्यांचा मुलगा त्याच्या भावी सासऱ्यांना गुडगावमधील एका उच्चभ्रू ठिकाणी भेटतो, तेव्हा तो त्याच्या वडिलांबाबतच्या न्यूनगंडाने पछाडतो.

चित्रपटांत नवे लेखक-दिग्दर्शक आले आहेत, ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असून त्यांचे जीवनानुभव एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. ‘बधाई हो’मधील वडील दिवसा रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून काम करतात आणि रात्री कविता लिहितात. ते आईला सोडू शकत नाहीत, त्यामुळे ते आई आणि पत्नीच्या भांडणात भरडत आहेत. किंवा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मधील वडील बघा, त्यांना आपला मुलगा गे आहे हे मान्य करावे लागते. मुलगा म्हणतो, ‘आयुष्यभर मुलगा होण्यासाठी मला भाडे द्यावे लागेल का?’ हा एक बदल आहे. आता मुलगा वडिलांना प्रश्न विचारू शकतो, पिता-पुत्राचे नाते आता एकतर्फी राहिलेले नाही. वडीलही आता त्यांच्या परिचित भूमिकेतून बाहेर येत आहेत, ज्यात ते कुटुंबाचा आर्थिक आधार असायचे, भावनिक आधार नव्हे. ‘बरेली की बर्फी’मध्ये पंकज त्रिपाठी मिठाईच्या दुकानाच्या मालकाची भूमिका साकारत आहेत. ते त्यांच्या मुलीसोबत सुखात आहेत. ते तिची सिगारेट चोरतात आणि तिला इतरांपेक्षा वेगळे होण्यापासून रोखत नाहीत. हिंदी चित्रपटांतील वडील आता खरोखर पूर्वीसारखे राहिले नाहीत. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

कावेरी बामजई पत्रकार आणि लेखिका kavereeb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...