आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Need To Change Our Attitude Towards 'learning' And 'retention'! | Article By N. Raghuraman

मॅनेजमेंट फंडा:‘शिकणे’ व ‘कायम ठेवणे’ याविषयीचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही अशा लोकांपैकी असाल की, ज्यांना कॉलेजमध्ये दोन वर्षे घालवल्यानंतर असुरक्षित वाटते. कारण तुम्ही बीएला प्रवेश घेतला आणि तुमचा एक शाळा-सोबती कॉम्प्युटर सायन्समध्ये आहे. आता तुम्हाला वाटते की, त्याला कोणत्याही आयटी कंपनीत चांगला पगार मिळेल आणि तुम्ही चांगली नोकरी शोधत राहाल, तर ही कथा तुमच्यासाठी आहे. मी अलीकडेच माझ्या एका सहकाऱ्याच्या मुलीला भेटलो. तिने इंग्रजीमध्ये एमए केले. तिला देशातील सर्वात मोठ्या आयटी फर्ममध्ये नोकरी मिळाली आहे आणि पगार आयटी इंजिनिअरच्या बरोबरीने आहे! त्यातही सॉफ्टवेअर डेव्हलपरपेक्षा जास्त पगार मिळाला. मी याचे गुपित विचारल्यावर ती म्हणाली, तिच्या विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात तांत्रिक लेखन असे विषय आहेत आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी आयटी कंपनीत इंटर्नशिप करणे अनिवार्य आहे. तेव्हा मला कळले की, टीसीएस, सिस्को, डेल, अॅक्सेंचरसारख्या आयटी कंपन्या इंग्रजी प्राध्यापकांकडून नव्हे, तर आयटी तज्ज्ञांकडून तांत्रिक लेखन शिकलेल्या भाषा पदवीधर विद्यार्थ्यांना घेत आहेत. हे पोस्ट ग्रॅज्युएट गुंतागुंतीच्या तंत्रज्ञान संकल्पनांना स्पष्टपणे मांडण्याच्या क्षमतेसह टेक डेव्हलपर्स आणि वास्तविक वापरकर्ते यांच्यातील एक पूल म्हणून काम करतात. एमिटीसारख्या काही विद्यापीठांनी त्यांच्या भाषेच्या २६% पदवीधरांना तंत्रज्ञानाच्या जगात स्थान मिळवून दिले आहे. एखादे उत्पादन तयार केले जाते तेव्हा ते त्या शब्दांसह ग्राहकांना आकर्षित करून विकले जाणे आवश्यक आहे. अनेक विद्यापीठांनी भविष्याचा अंदाज घेऊन या शिकवण्याच्या पद्धती सुरू केल्या आहेत. अशातच काही संस्था आता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याकडे लक्ष देत आहेत. कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे आहे, असे मला वाटते. भारतीय लष्कराप्रमाणेच काही कंपन्याही कर्मचाऱ्यांच्या पत्नींसोबत दोन वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये भागीदारी करत आहेत. इतरत्र नोकरीवर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी दिवसभरात काही वेळ विविध सामाजिक उपक्रम करत असतात. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) ही कंपन्यांच्या कर्तव्यापेक्षा एक नियमानुसार सक्ती झाली आहे, त्यामुळे आजूबाजूच्या समुदायामध्ये तोंडी प्रचारात हे पाऊल मदत करत आहे. उदा. आजूबाजूच्या काही झोपड्या पाहुण्यांसाठी त्रासदायक बनलेले एक हाॅटेल मला माहीत आहे. हॉटेलने ताबडतोब प्रत्येक झोपडीमधून एकाची निवड केली आणि त्यांना सीएसआरअंतर्गत हाऊसकीपिंग किंवा बॅक ऑफिस इ. चे प्रशिक्षण दिले. त्यातील काहींना हॉटेलमध्ये, तर काहींना इतर ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. आज हॉटेलजवळच्या झोपड्यांजवळून जाताना इथले लोक पाहुण्यांना संरक्षण देतात. ते त्यांना अभिवादन करतात. त्यांचे सामान गेटपर्यंत नेण्यास मदत करतात. पूर्वी ते रस्त्यावर खेळून चेंडूने वाहनांचे नुकसान करायचे. या सीएसआर उपक्रमाने केवळ हॉटेलला चांगले नाव दिले नाही, तर संपूर्ण परिसर स्वच्छ झाला आणि पाहुण्यांसाठी आनंददायक दृश्य बनवले. फंडा असा ः तुम्ही सभोवतालच्या गरजेनुसार सध्याची नोकरी समायोजित कराल तेव्हा ते केवळ नोकरीसाठी विद्यार्थ्यांची नियुक्ती सुलभ करेल असे नाही, तर कर्मचारीदेखील दीर्घ कालावधीसाठी कंपनीमध्ये राहतील.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...