आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:उत्तीर्ण होण्याबरोबरच शिकण्याचीही गरज

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशातील मुलांची शिकण्याची पायाभूत क्षमता घटून २०१२ पूर्वीच्या स्तरावर आली आहे. हे मी नाही म्हणत तर अॅन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन अहवाल २०२२ ने हे अधाेरेखित केले आहे. या अहवालानुसार ही घसरण खासगी-सरकारी शाळा आणि मुले आणि मुलीत समान बघितली गेली. कल्पना करा की, पहिलीतील सुमारे ४३.९% मुले एक पत्रही वाचू शकत नाहीत. त्याच वर्गातील ३७.६% मुले १ ते ९ पर्यंत उजळणी म्हणू शकत नाहीत, तर केवळ १२% मुलेच एक पूर्ण शब्द वाचण्यात सक्षम आहेत. सहा वर्षांचा मुलगा १ आकडा आणि अक्षरही वाचू शकत नाही, अशी तुम्ही कल्पना करू शकता काॽ जेव्ही आपल्या अवतीभोवती असलेल्या बहुतांश माता गर्वाने सांगू पाहताहेत की त्यांचा मुलगा काय काय करू शकतो.

मी तुम्हाला आणखी चकित करणारी माहिती देतो. आज महाविद्यालयांत बहुतांश होमवर्ग चॅटबॉट, चॅटजीपीटी, जिटहट, कोपायलट किंवा ब्लॅकबॉक्सकडून लिहिला जातो. हे सर्व अमेरिकेचे गुप्तहेर एजंट आहेत, ते व्हर्च्युअल रूपात आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये उपलब्ध आहेत. मी याला कंट्रोल सी किंवा कंट्रोल व्ही म्हणजे कॉपी-पेस्ट जनरेशन म्हणतो. ही कॉपी-पेस्ट पद्धती त्यांचे करिअर बिघडवू शकते. यामुळेच विकसित देशांतच नव्हे, भारतातील सर्व विद्यापीठे या सत्रापासून अभ्यासक्रमात बदल करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना गृहपाठाचा पहिला ड्राफ्ट वर्गखोलीत लिहावा लागेल आणि प्राध्यापकाकडून त्याची ढोबळ तपासणी केली जाईल. हा मुलांकडून होणारा एआयचा वापर रोखण्याचा प्रयत्न असून जे मुलांची सर्जनशीलता बाधित करत आहे.

आयटीसारख्या संस्थांमध्ये नवीन प्रोग्रामर्सला गुगलवर मोफत उपलब्ध टूल्सचा वापर करण्यास परावृत्त केले जात आहे. रिक्रूटर्स आपल्या उमेदवारांना किती खोलवर ज्ञान आहे हे तपासण्यासाठी बरीच चौकशी करत आहेत. तुम्ही पालक असाल तर शिक्षकाकडे माझ्या मुलाला शेजारी मुलापेक्षा कमी गुण का मिळाले, असे म्हणत भांडायला जाऊ नका. पालक-शिक्षक सभेला हजर राहा. शिकवण्याच्या पद्धतीत दोष शोधण्याऐवजी आपल्या मुलाच्या शिकण्याच्या क्षमतेविषयी प्रश्न करा. मुलगा कॉलेजमधून आल्यावर काय शिकला यावर बोला. जर तुम्हाला वाटत असेल की काही शिक्षक चांगले नाहीत, तर ही तुमची चूक असेल. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघितले होते, भव्य इमारत आणि ब्रँडेड कॉम्प्युटर लॅब बघून खूप आनंदी झाला होतात. परंतु शिक्षक योग्य आहेत का, चांगले शिकवतात का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. तुम्ही माजी विद्यार्थ्यांशी बोलला नाहीत. आपल्यासारख्या शिक्षितांसाठी ही एक मोठी अडचणीची स्थिती आहे. दर्जाहीन शिक्षणाने देश उद्याचे चांगले भविष्य घडवू शकत नाही. मुलांना आवडीचे शिकण्यासाठी वेळ द्या आणि त्यांना या क्षेत्रात निष्णात होण्याची संधी मिळवून द्या. यावर मला एक श्लोक आठवतो तो असा.. नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः। गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा॥ अर्थात, नराचा दागिना सौंदर्य आहे, गुणवत्ता सौंदर्याचा दागिना आहे, तर ज्ञान गुणवत्ता आणि धैर्याचा दागिना आहे.

बातम्या आणखी आहेत...