आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:खाण्यावर ‘लक्ष’ठेवण्याची गरज आहे ?

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फंडा असा की, खाण्यावर लक्ष ठेवणे हा शुद्ध वेडेपणा आहे. मग ती नजर कोणाची आहे, हे फार महत्त्वाचे नसते. गेल्या दोन दिवसांपासून मी जयपूरमध्ये होतो. येथील लिला हॉटेलमध्ये वधू शिवानी अग्रवाल यांच्या पाहुण्याच्या रुपयात या बड्या विवाह सोहळ्यात सहभागी झालो होतो. फॉरमल कपड्यात दाखल होताच मला कळून चुकले की, जयपुरी विवाह परीकथेसारखेच असतात. येथे प्रत्येक महिला महागडे दागिने, साडी परिधान करून आली होती. त्याचे कारणही तसेच. राजस्थानात लोक सर्वसामान्य दिवसांतही भरपूर आभूषणे परिधान करतात. लग्नात सहभागी होण्याचा हा स्तर ७ स्टार श्रेणीत पोहोचतो. समारंभाचे ठिकाण शहरापासून लांब ३५ किमी दूर लिला हॉटेलसारखे असेल तर मग बातच निराळी. गेल्या दोन वर्षांत विवाह सोहळ्यांना मर्यादित स्वरुप आले आहे. अतिशय जवळच्या लोकांनाच निमंत्रित केले जाते. त्यामुळे अनेक महिलांना आपल्याकडील कपडे-दागदागिने मिरवण्याची संधीच मिळाली नाही. कपडे आणि दागिन्यांची नवी फॅशन डोळ्यांसाठी एक सुरेख पर्वणीच होती.

समारंभ स्थळी जेवणाचा थाटच होता. मात्र यात एक अडचण होती. खाण्यासाठी काहीतरी आणण्यासाठी मी जात असे तेव्हा एक गुप्त कॅमेरा (माझ्या पत्नीचे डोळे!) माझ्यावर नजर ठेऊन असे. दुरून ती माझ्यावर नजर ठेऊन होती. फूड काउंटर आणि कॅमेऱ्यामधील गर्दीमुळे मला सुरक्षा कवच मिळाले होते. मात्र कॅमेरा बोर्डावरील ठळक अक्षरांतील पदार्थांची नावे वाचत होता. सुपर कॉम्युटर (पत्नीचा मेंदू) पदार्थ निवडीनंतर आवड-निवडीचे गणित मांडत होता. आपण मागे वळलो की डोळ्यांमधून कडक इशारा मिळणार असे वाटत होते. मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मात्र थेट तोंडी आदेश कडाडला, ‘तुम्ही खूप जास्त खात आहात.’

तो इशारा ऐकताच माझ्या मनात पिडीताची भावना निर्माण झाली. मी माझ्यासारख्या समदु:खी लोकांकडे पाहू लागलो. हे वागणे सामान्य आहे. जसे की एक स्मोकर बॉसचे रागावणे सहन करताना दुसरा स्मोकर त्याप्रती सहानुभूती दाखवतो. त्यानंतर काही वेळांनी, ‘चल, एक-एक कश मारून येऊ..’ असे म्हणत दोघेही बाहेर जाऊन सिगारेट पेटवतात. याच पंक्तीतल्या एका पिडीताला मी सोबत घेतले. एकमेकांप्रती सहानुभूती दाखवली. पतीच्या खाण्या-पिण्यावर पत्नीची नजर का असते? याची दर्दभरी कहाणी एकमेकांना ऐकवू लागलो. मला लक्षात आले होते. हे कशामुळे होते? कारण बहुतांश महिलांना (पत्नींना) माहित नसते की सरासरी १.६ किमी धावल्यानंतर पुरुषांच्या १२५ कॅलरी खर्च होतात. या एवढ्याच अंतरात महिलांच्या १०५ कॅलरी खर्च होतात. पुरुष तेवढेच अंतर पायी जातात तेव्हा ९० कॅलरी जळतात तर महिलांच्या ७५. स्कॉटलंडच्या एका विद्यापीठातील प्राध्यापक जॉन ब्रेव्हर यांच्या मते, पुरुषांचे वजन जरा जास्त असते. त्यांच्या शरीराला जास्त ऊर्जा लागते. चाळीशी पार केलेल्या ३०० हून जास्त धावपटूंवर नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, महिला-पुरुषांतील धमन्यांच्या कणखरतेत (स्टिफनेस) फरक आहे. ती शरीरातील सर्वात मोठी धमनी असते. पुरुष धावपटूंच्या धमन्या आपल्या वयाच्या सरासरी ९.६ वर्ष वयस्क आणि कणखर होती. महिलांमध्ये याविरुद्ध आहे. त्यांच्यातील धमन्या खूप तरुण होत्या. त्याचा अर्थ असा नाही की पुरुषांनी कसरती करू नयेत. त्याचा अर्थ असा की, पुरुष आणि महिलांमध्ये चरबी कमी होण्याचे लाभ वेगवेगळे असतात. त्यामुळे पुरुष कमी व्यायाम करत असतील तरी ते तेवढ्याच कॅलरीज जाळत असतात, जेवढ्या महिला. मात्र त्यामुळे पुरुषांना जास्त खाण्याची सवलत अजिबात मिळत नाही.

मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन

बातम्या आणखी आहेत...