आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘आरआरआर’ या नव्या ब्लॉकबस्टर चित्रपटात ‘शोले’ हे जोशपूर्ण देशभक्तीपर गीत आहे. त्यात देशाचे महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांची एक परेड दाखवली आहे. भगतसिंगांपासून सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज ते सरदार वल्लभभाई पटेल यांचाही त्यात समावेश आहे. मात्र, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू कुठे दिसत नाहीत. पण हे प्रथेविरुद्ध आहे. आज नेहरूंना भारताच्या इतिहासातून बेदखल करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी बॉलीवूड चरित्रपट आणि इतिहासपटांत जास्त रस घेताना दिसत आहे. नेहरू आणि इंदिरा गांधी पडद्यावर दाखवण्यासाठी आजही पहिली पसंती आहेत. ‘राधे श्याम’मध्ये हात पाहणारा नायक मिसेस गांधींना म्हणतो, ‘त्या लवकरच आणीबाणीची घोषणा करणार आहेत.’ (या चित्रपटाचा काळ हा १९७५ चा आहे. भविष्यवाणी ऐकून मिसेस गांधी चकित होतात.) ‘रॉकेट बॉइज’मध्ये स्वतंत्र भारतात विज्ञानाच्या विकासासाठी नेहरूंनी किती काम केले होते हे दाखवले आहे. नेहरू, गांधी कुटुंब आजही लोकप्रिय संस्कृतीतून बेदखल झालेले नाही. मात्र, क्वचितच त्यांना खलनायकाच्या रूपात दाखवले जाते.
‘गंगूबाई काठियावाडी’चे उदाहरण घेऊ. कामाठीपुऱ्यातील एका वेश्यागृहाची संचालिका नेहरूंकडे देहव्यापार वैध करण्याची मागणी करते. ते तिचे बोलणे अतिशय लक्षपूर्वक ऐकतात. ‘बेलबॉटम’मध्ये रॉचा हेर अक्षय कुमार थेट लोह-महिला आणि त्यांच्या प्रिय सल्लागाराकडून सल्ला घेतो. चित्रपटात त्यांना शक्तिशाली, आक्रमक आणि निडर नेत्या म्हणून दाखवले आहे. ‘थलाइवी’ चित्रपटातही इंदिरा गांधींना जयललितांशी दीर्घ आणि मैत्रीपूर्ण चर्चा करताना दाखवण्यात आले आहे. त्यानंतर तामिळनाडूतील घटनाक्रमांत राजीव गांधी यांचीही प्रमुख भूमिका दाखवली आहे. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असे मानणारी कंगना रनौतही सत्य नाकारू शकली नाही.
निर्माता एखाद्या कारणाने इतिहासातील दृश्यांची पुनर्रचना करू शकत नाही. उदा. ‘अ स्युटेबल बॉय’ ही बीबीसीची मालिका. त्यात स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीदरम्यान नेहरू बैतर आणि सलीमपूर या दोन काल्पनिक मतदारसंघात काल्पनिक उमेदवार महेश कपूरसाठी प्रचार करतात असे दाखवले आहे. तेथे ते डॉक्युमेंट्री फुटेजचा वापर करू शकतात. विक्रम सेठ यांच्या पुस्तकावर आधारित या मालिकेत नेहरूंचे ६२ वर्षे वय असूनही त्यांना अतिशय तरुण दाखवण्यात आले आहे. ते कपूरना भेटतात आणि म्हणतात - येथे आपण जिंकू शकत नाही, त्यामुळे येथे येण्यात फायदा नाही, असे मला सांगण्यात आले होते. मात्र, याच गोष्टीने मला येथे येण्यासाठी आणखी दृढ केले.’ ‘अ स्युटेबल बॉय’च्या दिग्दर्शिका मीरा नायर आपल्या आगामी चित्रपटात पहिल्या पंतप्रधानांना प्राधान्याने दाखवणार आहेत. हा चित्रपट चित्रकार अमृता शेरगिल यांच्या जीवनावर आधारित असेल. अमृता यांना वाटते की, नेहरू इतके महान आहेत की त्यांचे चित्रण करता येत नाही, असा उल्लेख यशोधरा दालमिया यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. अमृता आणि नेहरूंदरम्यान पत्रव्यवहारही झाला होता. मात्र, लग्नानंतर अमृता बुडापेस्टला रवाना झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यातील अनेक पत्रे नष्ट केली.
नेटफ्लिक्सवरील ‘क्राऊन’मध्ये नेहरूंचे अॅडविना यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंधांकडे निर्देश केला आहे. गुरिंदर चढ्ढा यांच्या ‘वायसरॉयज हाउस’मध्ये पहिल्या पंतप्रधानांचे अनेक आयाम प्रदर्शित करण्यात आले आहेत. आज नेहरू-गांधी कुटुंबाला कितीही भ्रष्ट ठरवण्याचे प्रयत्न होवोत, लोकप्रिय संस्कृतीतून त्यांना बेदखल करणे अशक्य आहे. अर्थात इतर राष्ट्रनायकांचे योगदानही तेवढेच स्वीकारले पाहिजे. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दाखवण्यात आले आहे. मुख्य प्रवाहातील एखाद्या चित्रपटात डॉ. आंबेडकर यांना महानायकाच्या रूपात दाखवले जाण्याची ही पहिलीच वेळ. दुसरीकडे विनायक दामोदर सावरकर यांच्यावर बनत असलेल्या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मेघना गुलजार यांचा ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित आहे. श्याम बेनेगल ‘मुजीब’ नामक चित्रपट बनवत आहेत. या दोन्ही चित्रपटांत नक्कीच मिसेस गांधी मुख्य भूमिकेत असतील. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) कावेरी बामजई पत्रकार आणि लेखिका kavereeb@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.