आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Netaji Laid The Foundation Of The Biggest Armed Revolution In Singapore's Cathay Building

15 दिवस विशेष फोटो स्टोरी:सिंगापूरच्या कॅथे इमारतीत नेताजींनी घातला होता सर्वात मोठ्या सशस्त्र क्रांतीचा पाया

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्रात सुभाषचंद्र बोस सिंगापूरमधील कॅथे बिल्डिंगमध्ये सभेला संबोधित करताना दिसत आहेत. याच ठिकाणी १९४० च्या दशकात बोस यांनी भारतातील पहिले अंतरिम ‘आझाद हिंद’ सरकार स्थापन केले होते. नेताजी त्याचे प्रमुख होते. येथेच त्यांनी रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल आर्मीची सूत्रे हाती घेतली.

भारतीय राष्ट्रीय सैन्यात सुमारे ४५ हजार सैनिक होते. डिसेंबर १९१२ मध्ये कलकत्ता येथे लॉर्ड हार्डिंगच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नानंतर रासबिहारी बोस जपानला गेले होते. जपान सरकारने त्यांचा ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ देऊन गौरव केला. १९२१ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी इंग्लंडमधील भारतीय नागरी सेवेतील नोकरी सोडून भारतात येणे हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख वळण मानले जाते. बोस ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र क्रांतीचे सर्वात मोठा नेते झाले. दुसऱ्या छायाचित्रात सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...