आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर भारतातील अनेक राज्यांत अत्याचार आणि विरोध केल्यास हत्यांच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत. आणखी एक पैलू म्हणजे किशोरवयीन विद्यार्थ्यांचे घरातून पळून जाणे. साहजिकच हे लोक शेवटी समाजकंटकांच्या हाती लागतात आणि मुलगीही वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकू शकते. मानसशास्त्रज्ञांच्या एका मोठ्या वर्गाचे मत आहे की, इंटरनेटच्या युगात पालकत्वाच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. मनःस्थिती आणि विचार विचलित करणारे व्हिडिओंची सहज उपलब्धता हे तरुणांमधील या नवीन पॅथॉलॉजीचे प्रमुख कारण आहे. हे खरे आहे की, आज स्वस्त इंटरनेट हे गरीब मुलांसाठीही मोफत कोचिंगचे वरदान आहे. परंतु, पालकांना हे पाहावे लागेल की, मुले ते नक्की कशासाठी वापरतात, विशेषत: त्यांच्या खोलीत, रात्री किंवा मित्रांसोबत. जिल्हास्तरावर प्रशासन, पोलिस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या माध्यमातून या दिशेने पालकांना सतर्क करावे लागणार आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, पालकांना वाटते की, मूल रात्री उशिरापर्यंत अभ्यास करते, तरीही गुण मिळत नाहीत. पण, इंटरनेटचा वापर कोणत्या उद्देशाने केला जातो हे पालकांना दिसत नाही. बहुतेक मानसशास्त्रज्ञ देशभरात पालकत्वाबद्दल नवीन जागृती निर्माण करण्याची गरज मानतात. दोन वर्षांपूर्वी पालकांचे लक्ष वेधून पंतप्रधान ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले होते, ‘आई-वडील मुलींवर लक्ष ठेवतात, पण संध्याकाळी तासन् तास घराबाहेर काय करत होतास, हे मुलांना विचारत नाहीत.’ यासंदर्भात संध्याकाळी खेळाच्या मैदानात मुलांनी घाम गाळावा, यावर भर देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.