आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • No Decision Should Be Made On The Basis Of Emotions| Article By N Raghuraman

मॅनेजमेंट फंडा:भावनांच्या आधारे कोणतेही निर्णय घेऊ नयेत

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या रविवारी मी आपल्या नियमित हेअर ड्रेसिंग सलूनमध्ये गेलाे होताे, तेथे त्याच्या मालकाने माझे आभाार मानले, कारण काही दिवसांपूर्वी मी त्याला एका आयडिया दिली होती. त्यावेळी एक श्रीमंत माणूस सलूनमध्ये आला होता. त्याने येताच आयफाेनचे चार्जर विचारले होते, तेथील एका कर्मचाऱ्याने हसत नाही सांगितले होते, आम्ही येथे केस कापतो सर, आयफोनसारखे मोठे ब्रँड्स विकत घेऊ शकत नाही. आमच्याकडे कुणाकडेही आयफोन नाही, त्यामुळे वायरही नाही. तो ग्राहक बाहेर निघाल्यावर बडबडू लागला, कसं सलून आहे, येथे आयफोनचे चार्जरदेखील नाही. तुम्ही लोक केस कापण्याचे इतके पैसे घेता मग बेसिक सुविधा देऊ शकत नाहीत का? तो गेल्यावर दुकानाचा मालक दु:खी झाला आणि म्हणू लागला, मी सलून चालवतो की एखादी टेक कंपनी, कळत नाही. खरच आयफाेनचे चार्जर बेसिक सुविधामध्ये येते का? अशा प्रकारच्या बेजबाबदार श्रीमंतांना मी डोक्यावर बसवत नाही. एखाद्या हेअरकटिंग दुकानावर अशा प्रकारच्या वस्तू मागणे योग्य नाही. त्या सलूनचे सर्व कर्मचारी त्यावेळी हसत होते. त्यानंतर अशा प्रकारच्या तरुण ग्राहकांच्या मागणीचा क्रमच सुरू झाला आणि सर्व तक्रारी सांगू लागले. मी त्याला शांतपणे म्हणालो, अशा गोष्टींनी भावनिक होण्याची गरज नाही, पण एक उद्योगपती होण्याच्या नात्याने व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आकलन करायला हवे. माझ्या व्यवस्थापनाच्या ज्ञानात भर घालत मी त्यांना नवीन युगातील ग्राहकांच्या समस्या समजावून सांगितल्या, नेट कनेक्शन नसेल किंवा फोनची बॅटरी संपत असेल तर असे लोक एका ठिकाणी थांबत नाहीत.

जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी आणि अधिक सेवा वापरण्यासाठी सलूनमध्ये जास्त काळ थांबण्यासाठी, काही पैशाची गुंतवणूक करून प्रत्येक सीटच्या बाजूला आयफोन प्लग पॉइंटसह लावावे. त्यात इतरही वायर जोडावेत, जेणेकरून इतर फोनही चार्ज होऊ शकतील. याशिवाय त्याला इंटरनेटची सुविधाही जोडावी. त्याने नुकतेच सर्व बदल केला, त्यामुळे आता लोक त्या सलूनमध्ये बराच वेळ बसत होते. जेथे पॉइंट लागू शकत नव्हते तेथे वायरलेस चार्जर लावलेले होते. मी त्याला विचारले, ११ महिन्यांआधीचे माझे एेकलेले दिसतेय, त्या माणसाच्या वागण्याने, बोलण्याने तुम्ही नाराज झाला होता. पण आता चांगला व्यवसाय केला असेल, हसत तो माझ्या बोलण्याशी सहमत झाला. मी त्याला म्हणालो, आपल्या बहिणीची बाजू ऐकून भावुक झालेल्या रावणाने आपल्या भावनेवर नियंत्रण मिळवले असते तर रामायणाची कथा आज वेगळीच असती, ती कथा ऐकत आपण मोठे झालो. आपल्या आयुष्यातील बऱ्याच निर्णयांना खरोखर भावना जबाबदार असतात. आपण सतत बदलणाऱ्या जगात राहत असल्याने आपल्याकडे विचार करण्यासारख्या आणखी गोष्टी असतात. आपण दररोज शेकडो निर्णय घेतो. नाश्त्यासाठी काय खावे यासारख्या साध्या निर्णयापासून ते जटिल व्यवसायाच्या धोरणापर्यंत. आपल्या संवेदना अनेक इनपुट आणि प्रत्येक नवीन माहिती प्रदान करत असल्याने ती ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि जगाविषयीच्या आपल्या दृष्टिकोनानुसार कार्य करण्यासाठी आपण जुन्या अनुभवांकडे पाहत असतो. कधीकधी आपला मेंदू जलद निर्णय घेण्यासाठी शॉर्टकट वापरतो, त्याला ह्युरिस्टिक्स म्हणतात, ते आपल्याला तुलनेने मोठ्या समस्येच्या काही भागांवर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते.

एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...