आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजून २००५ मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीधरांसाठी स्टीव्ह जॉब्ज यांना कमेन्समेंट भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. स्टीव्ह सामान्यत: सार्वजनिक भाषण देत नसत, तरीही ते तिथे गेले आणि त्यांनी जगाच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी व्याख्यानांपैकी एक व्याख्यान दिले. त्याला ‘स्टे हंग्री स्टे फुलिश स्पीच’ असेही म्हणतात. स्टे हंग्री स्टे फुलिश म्हणजे आपण नेहमी काही तरी शिकत राहण्याचा आणि सतत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
दुसऱ्या कुणाचे आयुष्य जगू नका... आयुष्यातील एक गोष्ट खात्रीपूर्वक सांगता येते आणि ती म्हणजे प्रत्येकाकडे मर्यादित वेळ असतो. इतरांसारखे बनण्याच्या प्रयत्नात आपण तो वाया घालवू शकत नाही. आज आपल्या आजूबाजूला हजारो मते आहेत, पण त्यामध्ये आपण आपला आंतरिक आणि मूळ आवाज गमावू नये. आयुष्य आपल्याला खूप संधी देत नाही, त्यामुळे आपल्याला मिळालेल्या संधींचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. सरतेशेवटी, आपल्याला पश्चात्ताप होऊ नये, यासाठी आपले जीवन पूर्णतः जगणे आवश्यक आहे.
आपली उत्कट आवड शोधा...
आपली खरी उत्कट आवड आणि सर्वात आवडती गोष्ट शोधण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्या जीवनात कोणतीही प्रेरणा, उत्कट आवड किंवा उद्देश नसेल तर आपण ध्येयविरहित भटकत राहू आणि आपली ऊर्जा एका दिशेने उत्पादनक्षमपणे बदलू शकणार नाही.
विश्वास ठेवणे गरजेचे आहे... याला आतली भावना म्हणा, नियती म्हणा, जीवन म्हणा की कर्म, पण आपल्याला कशावर तरी विश्वास ठेवावा लागेल. आपली आतली भावना आपल्याशी कधीच खोटे बोलत नाही. त्याचे ऐकले तर कमी चुका कराल आणि ज्या चुका कराल त्या कोणीही लादलेल्या नसतील.
मोकळे राहा आणि मन हलके ठेवा...
यश आपल्यासोबत जडपणा आणते, तर नवशिक्याकडे विशिष्ट मोकळेपणा आणि हलकेपणा असतो. आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरी नेहमी नवशिके राहावे. सर्जनशीलता आपल्यापासून कधीही दूर राहणार नाही.
स्टॅनफोर्ड स्पीच
वक्ते : स्टीव्ह जॉब्ज, अॅपलचे सहसंस्थापक, बिझनेस मॅग्नेट, अमेरिकन उद्योजक, इनोव्हेटर आणि तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.