आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन योजना बनवा आपण दिवसभरासाठी काय नियोजन केले आहे ते लक्षात घ्या.उदाहरणार्थ, कोणत्या वेळी तुम्हाला कोणते काम करावयाचे आहे याची योजना डायरीत, मोबाईल, कॅलेंडर किंवा डोक्यात असते, परंतु काही कारणांमुळे ती कामे वेळेत पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळेे इतर कामे अर्धवट सोडू नका. वेळेनुसार कामाच्या नियोजनाचा आढावा घ्या आणि त्यात बदल करुन कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे आहे हे निश्चित करा.
महत्त्वाच्या कामांना प्राधान्य सर्वप्रथम, तुम्ही तयार केलेल्या कामांच्या यादीतील सर्वात महत्त्वाची कामे कोणती आहेत ते पाहा. सूचीमधून ती कामे निवडा जी आजच पूर्ण करावीत. उरलेला अर्धा दिवस शिल्लक राहिलेल्या कामांना द्या. लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त अत्यंत महत्त्वाची कामे निवडायची आहेत. सूचीमध्ये दहा कामे असतील त्यातील फक्त महत्त्वाची तीन कामे निवडा. पुढील दिवसाच्या यादीत उर्वरित कामाचा समावेश करा. दुसऱ्या दिवसाची तयारी जर काम मोठे असेल आणि उरलेल्या दिवसात पूर्ण करता येत नसेल तर त्यानुसार योजना बदला. थोडा वेळ दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी वापरा. दुस-या दिवशी कोणते काम करायचे आहे आणि कोणत्या वेळी करायचे ते ठरवा. पुढच्या दिवसाचे नियोजन करणे हे देखील एक महत्त्वाचे काम आहे.
कामाचे रिमाइंडर तुम्ही योजना बनवता पण त्या लक्षात ठेवता येत नाहीत. परिणामी, तुम्ही इतर गोष्टींमध्ये व्यस्त होता. कामाच्या आराखड्यानुसार मोबाईलमध्ये रिमाइंडर सेट करा. यामुळे जेव्हा तुम्हाला काम आठवेल तेव्हा ते वेळेवर पूर्ण होईल. जर अर्धा दिवस संपला आणि अर्धा वेळ शिल्लक असेल तर रिमाइंडर तुम्हाला कामाची आठवण करून देईल. यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. कामाची विभागणी करा अर्ध्या दिवसानंतर तुम्ही काम करण्याच्या मूडमध्ये नसाल किंवा काही करण्याची इच्छा होत नसेल तर कामाचे विभाजन करा. दिवसभरातील कामाच्या यादीत जे सर्वांत महत्त्वाचे काम आहे ते निवडा. त्यानंतर कामाला लगेच पूर्ण करण्याऐवजी थोडे थोडे करा. जर तुम्ही कामासाठी आजचा दिवस निश्चित केला असेल आणि काही कारणास्तव ते काम पूर्ण होऊ शकले नाही तर उरलेल्या वेळेत फक्त थोडेच काम व्यवस्थित करा. उरलेले काम दुसऱ्या दिवशीच्या नियोजनामध्ये समाविष्ट करा.
विचार करा आणि शिका लक्षात ठेवा की प्रत्येक दिवस, वेळ तुम्हाला काही ना काही शिकवते आणि त्यातून तुम्ही शिकून पुढे जाल तेव्हा त्याबाबत विचार कराल. तुमच्या चुकांवर चिंतन करा, शिका आणि पुढे जा. त्यामुळे तुम्ही काय चूक आणि योग्य करत आहात याचा पश्चात्ताप करण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा.
वातावरण बदला अर्धा दिवस उलटून गेल्यावर तसंही कोणालाच काम करावेसे वाटत नाही आणि तुम्हाला ते करावयाचे असले तरी वातावरण असं असतं की तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही. उरलेल्या दिवसाचा सदुपयोग करायचा असेल तर आधी कामाची वातावरण निर्मिती करा. वातावरण बदलले तर कामातही लक्ष लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.