आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Now Each Story Is Bringing The World Closer Together| Article By Minika Sherhil

यंग इंडिया:आता प्रत्येक कथा जगाला आणखी जवळ आणत आहे

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय मनोरंजन उद्योगासाठी हा अविश्वसनीय काळ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशा कथांचे वैविध्य मी यापूर्वी पाहिले नव्हते. आपल्याला लोक आणि विषयांबद्दलच्या अशा कथा पाहायला मिळत आहेत, ज्या पूर्वी क्वचितच दिसल्या होत्या. कथाकथन हा नेहमीच आपल्या समाजाच्या हृदयाचा ठोका राहिला आहे. आणि आता अशा अनेक कथांना भारतात आणि जगभरात अनेक प्रेक्षक मिळत आहेत, यावरून या कथा सर्वव्यापी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होते.

नवीन भारतीय कथेची ओळख करून देताना आपण भारतीय प्रेक्षकांना ती कथा आवडेल आणि ते त्याचा आस्वाद घेतील, याची खात्री करतो. आणि आपल्याला योग्य कथा सापडतात तेव्हा त्यांचे प्रतिध्वनी जगभर पसरतात. एका सामान्य माणसाची सुपरहीरो बनण्याची कथा मल्याळममध्ये सांगितली जावी किंवा ब्राझीलमध्ये सबटायटल्ससह पाहिली जात असेल, तर ‘मिनल मुरली’ चित्रपटाप्रमाणे तोच उत्साह आणि थरार निर्माण करते. त्याचप्रमाणे ‘गंगुबाई काठियावाडी’च्या कथेने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आणि नंतर ओटीटीच्या माध्यमातून ती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. हास्य, आनंद, वेदना, दु:ख अशा भावना जागृत करू शकणारी एखादी मूळ आणि अस्सल कथा सर्वांच्या जाणिवांच्या कक्षेत उतरते-मग भाषा कोणतीही असो.

प्रश्न असा आहे की, कथा नेहमीच सर्वव्यापी होत्या, तर आता काय बदलले आहे? याचे उत्तर आहे स्ट्रीमिंग सेवा. उत्तमोत्तम मनोरंजन आणि तंत्रज्ञान एकत्र करून मनोरंजनाला विश्वव्यापी करण्याची अतुलनीय क्षमता स्ट्रीमर्सकडे आहे. आम्ही जगभरातून आश्चर्यकारक मनोरंजन तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करतो आणि वैयक्तिकृत मार्गांनी आमच्या प्रेक्षकांसमोर सादर करतो. प्रेक्षकांसाठी जगभरातील कथा उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच लंडनमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना लखनऊवर आधारित ‘माय’ या थ्रिलर मालिकेचा आनंद घेता येईल. भारतात बनवलेल्या चित्रपटांचे किंवा मालिकांचे जागतिक प्रीमियर तसेच ‘द अॅडम प्रोजेक्ट’ किंवा ‘ब्रिजटन’सारख्या जगभरातील कथा एकाच वेळी भारतातही कशा प्रकारे प्रदर्शित होतात हे पाहणे खूप मनोरंजक आहे. याचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय अॅमी जिंकणारा ‘दिल्ली क्राइम’.

उत्कृष्ट उपशीर्षके आणि डबिंगसह प्रेक्षक जगाच्या विविध भाग व भाषांमधील मूळ कथा शोधत आहेत आणि त्या त्यांना आवडत आहेत. अलीकडच्या काळात दक्षिण भारतात बनवलेले चित्रपट देशभरात आणि जगात धुमाकूळ घालत आहेत. मिनल मुरली, नवरसा आणि जगमे थांडीराम हे चित्रपट काही उदाहरणे आहेत. भारतातील लोकांनी मनी हेस्ट, स्क्विड गेम आणि ब्रिजर्टन यांसारख्या जागतिक हिट चित्रपटांचादेखील आनंद घेतला आहे, त्यांना भारतीय भाषांमध्ये सबटायटल आणि डब केले गेले आहे. तथापि, बरेच काही करणे बाकी आहे. ‘ऑडिओ डिस्क्रिप्शन’ हे एक पर्यायी डिस्क्रिप्शन आहे, ते शारीरिक क्रिया, चेहऱ्यावरील हावभाव, पोशाख, सेटिंग्ज आणि दृश्यांमधील बदलांसह ऑन-स्क्रीन घटनांचे वर्णन करते; किंवा ‘क्लोज्ड कॅप्शन्स’ यात पार्श्वभूमीचा आवाज, पार्श्वसंगीत किंवा बोलणाऱ्या पात्रांच्या नावांचे वर्णन असते - या वैशिष्ट्यांनी प्रेक्षकांना मनोरंजनाचा सहज आनंद घेण्याचे साधन दिले आहे.

ऑन-स्क्रीन आणि पडद्यामागील काम करणाऱ्या लोकांच्या सहकार्याने काम करण्यासाठी जगभरातील अभूतपूर्व संधी सादर करणे आता अधिकाधिक शक्य होत आहे. राणा दग्गुबती लवकरच ‘राणा नायडू’ या मालिकेत दिसणार आहे, तर धनुष ‘द ग्रे मॅन’ या ग्लोबल इंग्रजी चित्रपटात दिसणार आहे. ही केवळ काही उदाहरणे आहेत- कारण आता प्रत्येक कथा जगाला जवळ आणत आहे. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) मोनिका शेरगिल व्हाॅइस प्रेसिडेंट-कंटेंट नेटफ्लिक्स इंडिया

बातम्या आणखी आहेत...