आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Now There Is No Leader As Powerful As Sandberg; Of The 150 Tech Companies, Only 4% Are Women Cecila Kang, Erin Griffith

विश्लेषण:आता सँडबर्गसारख्या ताकदवान नेत्या कुणी नाही; 150 टेक कंपन्यांत केवळ 4% महिला उच्चपदस्थसेसिला कांग, एरिन ग्रिफिथ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेरिल सँडबर्ग यांनी या आठवड्यात फेसबुक-मेटाच्या मुख्य ऑपरेटिंग अधिकारी पदाचा राजीनामा देत आपल्या कंपनीत महिलांच्या प्रगतीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. त्या म्हणाल्या, या कंपनीत अनेक प्रतिभावंत महिला आणि विविध पार्श्वभूमीतून आलेले लोक नेते बनले आहेत. याचा मला अभिमान आहे. मात्र, वास्तविक चित्र वेगळे आहे. टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये सर्वोच्च पदांवरील महिलांची संख्या निराशाजनक आहे. सँडबर्ग यांच्या जाण्याने सिलिकॉन व्हॅली आपली सर्वात स्पष्टवक्ती व सक्रिय महिला अधिकारी गमावणार आहे. आता त्यांच्यासारखे लोक नगण्य किंवा शून्य राहतील.

लॅरी पेज आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यासारख्या कंपनी संस्थापकांच्या पातळीपर्यंत पोहोचणाऱ्या ५२ वर्षांच्या सँडबर्ग प्रमुख टेक्नोलॉजी कंपन्यांमधील गटाचा एक भाग होत्या. त्या मोठ्या व्यावसायिक परिषदेत सहभागी होऊन प्रमुख भाषण देत असत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये याहूच्या मेरिसा मेयर, ह्यूलॅट पॅकार्डच्या मेग व्हिटमॅन आणि आयबीएमच्या जिनी रोमेटीसह अशा अनेक महिला पद सोडून गेल्या आहेत. यापैकी काहींच्या प्रतिष्ठेला आघात पोहोचला आहे. याशिवाय अलीकडच्या काळात अल्फाबेट-गुगल, अॅपल, अॅमेझॉन, मेटा आणि इतर बड्या टेक कंपन्यांमध्ये महिला विशेष प्रगती करू शकल्या नाहीत. जागतिक अर्थव्यवस्था आणि लोकांच्या आयुष्यावर तंत्रज्ञानाचा अधिक प्रभाव आहे. तरीही नेतृत्वाबाबत महिला अन्य उद्योगांपेक्षा मागे आहेत.

२०२० मध्ये उत्पन्नानुसार सिलिकॉन व्हॅलीतील १५० बड्या कंपन्यांमध्ये केवळ ४.८ टक्के नेतृत्व महिलांच्या हाती होते. कायदेशीर व्यवहार पाहणारी कंपनी फेनविक अँड वेस्टच्या मते, २०१८ मध्येही अशीच स्थिती होती. याच्या तुलनेत एसअँडपी ५०० इंडेक्सच्या कंपन्यांत महिला चीफ एक्झिक्युटिव्हचे प्रमाण २०१८ च्या ४.८ टक्क्यांनी वाढून २०२० मध्ये ६ टक्के झाले. ट्विटरच्या जनरल काउन्सिल विजया गाडेंसह सार्वजनिक व्यवसायाशी संबंधित टेक कंपन्यांमध्ये उच्च पदांवरील महिलांचा छळ करण्यात आला. पिनट्रेस्टच्या माजी मुख्य ऑपरेटिंग अधिकारी फ्रान्कोइस ब्राउगरसारख्या इतर महिला अधिकाऱ्यांनी भेदभावाचा आरोप करत खटले दाखल केले. एक नवा ट्रेंड समोर आला आहे. गेल्या काही वर्षांत टेक कंपन्यांत महिला नेतृत्वाला इतरांकडून करण्यात आलेल्या घोटाळ्यांची स्वच्छता करण्यासाठी नियुक्त केले होते.

महिलांचा लैंगिक छळ, भेदभावाची अनेक प्रकरणे
काही कंपन्यांत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही टेक्नॉलॉजी क्षेत्रात महिलांना अजूनही अडथळ्यांचा सामना करावा लागतो. व्हेंचर कॅपिटल कंपन्यांमध्ये पुरुषांचा दबदबा आहे. महिला संस्थापकांना निधीत खूप कमी वाटा मिळतो. सिलिकॉन व्हॅलीत महिलांशी भेदभाव, छळ, कामाच्या ठिकाणच्या दूषित वातावरणाचे तपशील समोर येत राहतात. व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर अॅलन पाओ यांनी २०१२ मध्ये आपल्या कंपनीच्या नियोक्त्या क्लीनर पार्किन्स यांच्यावर भेदभावाचा खटला दाखल केला होता. त्या २०१५ मध्ये केस हरल्या, पण त्यांच्या खटल्याने सिलिकॉन व्हॅलीत पुरुषांच्या वर्चस्वातील त्रुटी उघड केल्या. २०१७ मध्ये सिलिकॉन व्हॅलीत ताकदवान पुरुषांकडून लैंगिक छळाची प्रकरणे मीटू आंदोलनाचा भाग बनली.

बातम्या आणखी आहेत...