आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Nowhere Does China Exist As A Financial Superpower | Article By Ruchir Sharma

दृष्टिकोन:वित्तीय महासत्तेच्या रूपात कुठेच नाही चीनचे अस्तित्व

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्तरावर चीनचा उदय ही कदाचित या शतकातील सर्वाधिक पुनरावृत्ती होणारी कहाणी आहे. चीनने आर्थिकसोबतच आपले लष्करी सामर्थ्यही झपाट्याने वाढवले आहे. असे असूनही आज चीनला आर्थिक महासत्ता म्हटले जात नाही. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. १९२० च्या दशकात डॉलर जागतिक चलन बनण्याआधीच अमेरिका आर्थिक व वित्तीय शक्ती बनली होती. त्यापूर्वी ब्रिटनपासून पोर्तुगालपर्यंतच्या अनेक साम्राज्यांची अशीच कहाणी होती. चीन हा एकमेव असा देश आहे, जो झपाट्याने आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला, पण वित्तीय शक्ती म्हणून त्याचे अस्तित्व नाही. असे करून तो त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही धुडकावून लावत आहे. दोन दशकांपूर्वी चीनने जागतिक व्यापार सुरू केला तेव्हा तो जगात आपले आर्थिक आणि वित्तीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मार्गावर असल्याचे वाटत होते. २०१० च्या सुमारास बीजिंगने रॅनमिनबीला जागतिक चलन म्हणून प्रस्थापित करण्यासह आपल्या आर्थिक महत्त्वाकांक्षांना आवाज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने झपाट्याने प्रगती केली, पण आता तो थांबला आहे.

२००० पासून जगाच्या जीडीपीमध्ये चीनचा वाटा ४ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे आणि जागतिक व्यापारातील चीनचा सहभागही चार पटींनी वाढून १५ टक्के झाला आहे. जगातील इतर कोणत्याही अर्थव्यवस्थेने इतक्या वेगाने वाढ केलेली नाही. असे असूनही आज चिनी शेअर बाजार जगातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे. किंबहुना, चीनच्या उदयाने सामूहिक कल्पनेत इतकी वाढ केली आहे की कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियासारख्या छोट्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत जागतिक मध्यवर्ती बँकेच्या रिझर्व्हमधील रॅनमिनबीचा तीन टक्के वाटा ही चांगली प्रगती मानली जाते. विश्लेषकांना चीनकडून अपेक्षित असलेल्या अपेक्षांच्या हे नक्कीच खूप मागे आहे. याचे कारण आहे विश्वासाचा अभाव. परदेशी लोकांना चीनच्या अनाहूत सरकारपासून दूर राहायचे आहे, हे खरे आहे, परंतु समस्या अशी आहे की चीनच्या लोकांचा स्वतःच्या आर्थिक व्यवस्थेवर विश्वास नाही. गेल्या दशकात चीनने विकासाला चालना देण्यासाठी इतक्या नवीन नोटा छापल्या की चलन पुरवठ्याने अर्थव्यवस्था आणि बाजाराला मागे टाकले आहे. संधी मिळताच हे भांडवल निघून जाईल. सात वर्षांपूर्वी बीजिंग भांडवलाच्या आऊटफ्लोशी झुंजत होते तेव्हा सरकारने त्यावर अंकुश ठेवण्यासाठी निर्बंध लादले होते. ते निर्बंध अद्याप उठवण्यात आलेले नाहीत. त्याऐवजी चीन वित्तीयदृष्ट्या स्वतःपुरता मर्यादित आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय बँक व्यवहारांसाठी तयार केलेल्या स्विफ्ट नेटवर्कवरून रॅनमिनबीद्वारे पेमेंट २० टक्क्यांनी घटले आहे, ते आधीपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी होते. कॅपिटल अकाउंट ओपननेसच्या निर्देशांकात चीन जगातील १६५ देशांपैकी १०६ व्या क्रमांकावर आहे. मादागास्कर आणि मोल्दोव्हासारखे देशदेखील या क्रमात आहेत.

चिनी गुंतवणुकदारांना परदेशात गुंतवणूक करण्यास मनाई असताना बाजारावर नियंत्रण ठेवण्याच्या चिनी सरकारच्या प्रयत्नांना परदेशी लोक घाबरतात. यामुळेच चीनचे शेअर्स इतर देशांप्रमाणे आर्थिक वाढीसह वाढत किंवा घसरत नाहीत. चिनी बाजारांबद्दल जगाच्या संशयामुळे रॅनमिनबीचे आकर्षण मर्यादित झाले आहे. आज जगातील निम्मे देश परकीय चलन म्हणून डॉलर वापरतात, त्यापैकी कोणीही चिनी चलन वापरत नाही. जगातील परकीय चलनाच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरचा वाटा ९० टक्के आहे, रॅनमिनबीमध्ये पाच टक्केही नाही. १९८० च्या दशकात जपान आपल्या शिखरावर होता तेव्हा तो आर्थिक शक्तीबरोबरच वित्तीय शक्ती म्हणूनही उदयास येत होता. जपानी येन आणि त्याचा शेअर बाजार या दोघांनी ती ताकद दाखवली. टोकियो हे जागतिक आर्थिक केंद्र झाले होते. हीच गोष्ट आज चीनचे चलन, शेअर आणि त्याच्या कोणत्याही शहराबाबत म्हणता येणार नाही.

रशियावर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेने डॉलरची ताकद कशी वापरली हे चीन सरकारने पाहिले आहे. चीनलाही तीच सत्ता हवी आहे. पण, आधी त्याने भांडवलावर नियंत्रण ठेवण्याचा आणि त्याचे चलन पूर्णपणे परिवर्तनीय बनवण्याचा आत्मविश्वास दाखवला पाहिजे. त्याशिवाय तो महासत्ता बनू शकणार नाही.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) रुचिर शर्मा ग्लोबल इन्व्हेस्टर व बेस्टसेलिंग रायटर breakoutnations@gmail.com

बातम्या आणखी आहेत...