आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Obsessed With Trekking And Parathas, Gifts Kit Bags To Junior Players After The Tournament

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - ऋषभ पंत:ट्रेकिंग आणि पराठ्यांचे वेड, स्पर्धेनंतर ज्युनियर खेळाडूंना किट बॅग देतो भेट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंत याचा नुकताच गुरुकुल नारसनजवळ अपघात झाला. पंतला गंभीर दुखापत झाली आहे. जन्म : ६ आॅक्टोबर १९९७, रुरकी शिक्षण : बीकॉम (दिल्ली विद्यापीठ) कुटुंब : वडील कै. राजेंद्र पंत, आई सरोज पंत, बहीण साक्षी पंत {मालमत्ता ः ७० कोटी रु. (विविध मीडिया रिपोर्ट््सनुसार)

२०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका झाली. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६ धावांत बाद झाला होता. यानंतर ऋषभ पंतची संघात निवड झाली. पंतने सिडनीतील तिसऱ्या सामन्यात ९७ धावांची खेळी करत सामना अनिर्णित केला. गाबा येथील चौथ्या सामन्यात ८९ धावांच्या नाबाद खेळीने संघाला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आयसीसीने त्याची २०२१ च्या कसोटी संघासाठी निवड केली. मात्र, वर्षभरापूर्वी परिस्थिती अगदी उलट होती. २०१९ क्रिकेट विश्वचषकातून वगळल्यानंतर भारतीय संघात ऋषभ पंतवर सर्वाधिक टीका झाली होती. नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मधील वाईट क्षेत्ररक्षणासाठी प्रेक्षकांनी पंतला ‘धोनी-धोनी’ म्हणत चिडवायला सुरुवात केली. एका मुलाखतीत पंत म्हणाला, ‘क्रिकेटमध्ये नेहमीच चढ-उतार असतात आणि मी त्यातन शिकतो.’ पंत प्रत्येक मालिकेनंतर ज्युनियर क्रिकेटपटूंना त्याची किट बॅग देतो. बीसीसीआयचे कंत्राट मिळाल्यापासून तो हे करत आहे. त्याने सांगितले की, त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हादेखील त्याला फलंदाजी, वस्तू, बूट आणि बॅट द्यायचे. पंतला ट्रेकिंगची आवड आहे. तो कॉफी आणि पनीर पराठ्याचा चाहता आहे.

करिअर : ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये कसोटी शतक ठोकणारा पहिला आशियाई यष्टिरक्षक पंतने २०१५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, २०१६ च्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये चर्चेत आला. त्याने अवघ्या १८ चेंडूंत ५० धावा केल्या, हा एक विक्रम आहे. त्याच वर्षी आयपीएलमध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने विकत घेतले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावणारा ऋषभ हा आशियातील पहिला यष्टिरक्षक आहे. पंतने ३३ कसोटी, ३० एकदिवसीय आणि ६६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याची कसोटी सामन्यांमध्ये ५ शतके आहेत. कसोटी सामन्यांत सर्वाधिक ११ यष्टिचित करणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक आहे. हा विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता.

सुरुवातीचे जीवन एका खोलीच्या घरात गेले बालपण ऋषभ पंतचा जन्म उत्तराखंडमधील रुरकी येथे राजेंद्र व सरोज पंत यांच्या पोटी झाला. राजेंद्र एका खासगी कंपनीत मॅनेजर होते. संपूर्ण कुटुंब एका खोलीच्या घरात राहत होते. वडील राजेंद्र हेदेखील विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले होते, त्यामुळे ऋषभनेही क्रिकेटपटू व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पंत लहानपणी लाँड्री बॅग घेऊन क्रिकेट खेळायचे. अशा परिस्थितीत वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वडिलांनी त्याला बॅट मिळवून दिली. चांगल्या क्रिकेट कोचिंगसाठी दिल्लीच्या सॉनेट क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला. वयाच्या १२ व्या वर्षी ऋषभ आईसोबत खेळण्यासाठी रुरकीहून दिल्ली क्लबमध्ये जात असे. रात्री २.३० वाजता रुरकीहून बसने जाऊन दिल्लीत सामने खेळण्यासाठी सकाळी ६ वा. पोहोचणे. दिल्लीत राहायला जागा नव्हती, त्यामुळे मोतीबागच्या गुरुद्वारात आईसोबत रात्री मुक्काम करत असे. तो खेळायला जायचा तेव्हा आई गुरुद्वारात सेवा करायची. आई-मुलाचा संघर्ष पाहून राजेंद्र कुटुंबासह दिल्लीत आले.

रंजक आणि वाद : खेळाडूंना मैदानातून परत बोलावले {गेल्या वर्षी २२ एप्रिलला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन त्याच्या सहकाऱ्यांना मैदानातून परत बोलावले होते, त्यानंतर त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. तथापि, सामना नंतर खेळला गेला. {ऋषभ पंत त्याच्या उत्तराखंड राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी ऑगस्ट २०२२ मध्येच त्याला ‘स्टेट ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून जाहीर केले. {त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी त्याला अधिक संधी मिळण्यासाठी दिल्लीऐवजी राजस्थानकडून खेळण्यास सांगितले. प्रशिक्षकाचे म्हणणे ऐकून तो राजस्थानकडून खेळण्यासाठी गेला, पण तिथे त्याला ‘आउटसाइडर’ म्हणून बाहेर फेकण्यात आले. {ऑस्ट्रेलियन दिग्गज यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्ट हा पंतचा आदर्श आहे. लहानपणापासून गिलख्रिस्टला फॉलो करतो, असे पंतने अनेकदा सांगितले आहे. त्याची खेळण्याची शैलीही गिलख्रिस्टसारखीच आहे.

बातम्या आणखी आहेत...