आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विनापरवानगी फाेटाे जाहीर केल्यास गुन्हा

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरणाने परवानगीविना एखाद्याचा फाेटाे, व्हिडिओ काढता येताे किंवा नाही यावरून प्रायव्हसीबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सुप्रीम काेर्टाचे वकील सुमीत वर्मा, मनीष पाठक, विराग गुप्ता व मनीष भदाैरिया यांनी ‘भास्कर’चे प्रतिनिधी पवनकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार विना परवानगी कोठेही फोटो काढता येऊ शकत नाही. तज्ञांनी प्रायव्हसीबद्दलच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली..

सार्वजनिक ठिकाणी एखादा अर्धनग्न असल्यास त्याच्या परवानगीविना फाेटाे काढता येताे का? नाही. विनापरवानगी एखाद्याचे छायाचित्र काढणे प्रायव्हसीचे उल्लंघन ठरते. सर्वाेच्च न्यायालयाच्या ९ न्यायमूर्तींच्या पीठाने २०१७ मध्ये एका निवाड्यात देशातील नागरिकांचा गाेपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले हाेते. या निर्णयानंतरही केंद्राने आजतागायत त्याविषयीचा कायदा तयार केला नाही. अशा प्रकरणात शिक्षेची काहीही तरतूद नाही.

एखाद्याने विनापरवानगी फाेटाे काढल्यास प्रायव्हसीचे उल्लंघन झाल्याचा दावा करता येताे? प्रायव्हसी कायद्यात नाही. परंतु कायद्याच्या इतर तरतुदीनुसार विनापरवानगी फाेटाे काढणाऱ्यावर कारवाई केली जाऊ शकते.

विनापरवानगी फाेटाे किंवा व्हिडिआे काढून ताे साेशल मीडियावर प्रकाशित केल्यास ? पुरुष व महिलांच्या बाबतीत तरतूद वेगवेगळी आहे. महिलेच्या परवानगीविना फाेटाे साेशल मीडिया किंवा इतर ठिकाणी अपलाेड केल्यास कलम ३५४, कलम ६६ ई व ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकताे. पुरुषासाेबत असे झाल्यास कलम ५०९ अंतर्गत फाैजदारी किंवा मानहानीचा खटला दाखल करता येऊ शकताे. नुकसान भरपाईही मागता येऊ शकते.

पत्रकार तसेच पाेलिस फाेटाे घेत असल्यास ते गुन्ह्याच्या कक्षेत येते? पत्रकाराला समाजातील घटना चव्हाट्यावर आणण्यासाठी विनापरवानगी फाेटाे काढण्याची मुभा आहे. त्यास कायद्यात गुन्हा ठरवलेले नाही. पाेलिसांना सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या जाेडप्याचे फाेटाे काढता येऊ शकताे. हा त्यांचा अधिकार आहे. कारण ही बाब कायदा-सुव्यवस्थेशी निगडीत आहे.

रस्त्यावर मारहाण हाेत असलेला व्हिडिआे सामान्य व्यक्तीने बनवल्यास ताे गुन्हा ठरतो ? नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असलेल्या ठिकाणी पाेलिसांच्या तपासाला मदत म्हणून अशा सामग्रीचा वापर हाेऊ शकताे. म्हणून व्हिडिआे शूट केला जाऊ शकताे. गुन्हेगारी घटना, दंगल किंवा इतर गंभीर प्रकरणात असे करता येऊ शकते.

महिला आकर्षक मुद्रेत असताना फोटो काढल्यास? ही कृती देखील गुन्ह्याच्या कक्षेत समाविष्ट होऊ शकते. विनापरवानगी छायाचित्र काढणे गुन्हा ठरतो. महिला कोणत्याही ठिकाणी असो किंवा परिस्थितीत असो फोटोसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

बातम्या आणखी आहेत...