आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Once Held The Job Of A Watchman, Then A Three time MLA, But No Ministerial Position; Now Directly Chief Minister

चर्चेतील व्यक्तिमत्त्व:एकेकाळी केली वाॅचमनची नोकरी, नंतर तीनदा आमदार, पण मंत्रिपद नाही; आता थेट मुख्यमंत्री

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म : २६ मार्च १९६४, हिमाचल कुटुंब : पत्नी- कमलेश ठाकूर, दोन मुली शिक्षण : एमए, एलएलबी मालमत्ता : ७ कोटी रु. (विविध मीडिया रिपोर्ट््सनुसार)

वर्तमानपत्रे आणि दूध विकून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. विद्युत विभागात वॉचमन. आता हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री आहेत. सुखविंदरसिंग सुक्खू यांचा हा परिचय आहे. अतिशय विनम्र कुटुंबातून आलेल्या सुखविंदर यांनी महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेमधून राजकारणाला सुरुवात केली. सुखविंदर यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, आमदार होऊनही त्यांनी ना पोलिस गार्ड घेतला ना सरकारी वाहन. ते बहुतांश वेळा त्यांच्या अल्टो कारमधून फिरत असत. विधानसभेत प्रत्येक वेळी सुक्खू अल्टो कारमधूनच यायचे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या वेळी सुखविंदर यांनी आपण निवडणूक जिंकू शकणार नाही, असे म्हटले होते. तसेच निवडणूक जिंकल्यानंतर आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले होते.

सुखविंदर काँग्रेस हायकमांडच्या जवळचे मानले जातात. तीन निर्णय याची पुष्टी करतात. सुक्खू यांना प्रदेशाध्यक्ष बनवताना वीरभद्र सिंह यांचा विरोधही दिसून आला, मात्र काँग्रेसने पर्वा न करता त्यांना प्रदेशाध्यक्ष केले. याशिवाय निवडणुकीत उमेदवार निवड समितीत त्यांचा समावेश करून आणखी एक मोठी जबाबदारी दिली. आता त्यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना वीरभद्र सिंह यांच्या पत्नी व काँग्रेसच्या विद्यमान प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्यापेक्षा प्राधान्य दिले. आज हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खू यांच्याबद्दल जाणून घ्या.

कुटुंब : परिवहन मंडळाच्या बसचे चालक होते वडील सुखविंदर सुक्खू यांचा जन्म हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात रसीलसिंग व संसारदेवी यांच्या पोटी झाला. रसीलसिंग हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये चालक होते, तर संसारदेवी गृहिणी आहेत. सुखविंदर यांनी सुरुवातीचे शिक्षण सरकारी हायस्कूल, कसुम्प्टी, सिमला येथून पूर्ण केले. त्यानंतर संजौलीच्या शासकीय महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी वीज विभागात चौकीदार म्हणून काम करू लागले. पुढे ते येथे मदतनीस झाले. चार भावंडांपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या सुखविंदर यांचे सुरुवातीचे जीवन कठीण होते. त्यांचा मोठा भाऊ राजीव लष्करातून निवृत्त आहेत. दोन छोट्या बहिणींचे लग्न झाले. त्यांनी ११ जून १९९८ रोजी कमलेश ठाकूरशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत, त्या दिल्ली विद्यापीठात शिकत आहेत.

करिअर : विद्यार्थी संघटनेपासून सुरुवात करून मुख्यमंत्रिपदापर्यंत सुखविंदर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमधून केली. येथे त्यांची सिमला येथील संजौली महाविद्यालयात वर्ग प्रतिनिधी आणि विद्यार्थी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस म्हणून निवड झाली. यानंतर शासकीय महाविद्यालय संजौली येथे विद्यार्थी मध्यवर्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. येथूनच सुखविंदर एक मजबूत युवा नेता म्हणून उदयास आले. यानंतर ते १९८८ मध्ये एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष झाले. १९९५ मध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस झाले. १९९८ ते २००८ अशी सलग १० वर्षे ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००८ मध्ये प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस झाले. २०१३ मध्ये हिमाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष झाले. ते दोन वेळा सिमला महापालिकेचे नगरसेवकही होते. २००३ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर २००७, २०१७ आणि आता २०२२ मध्ये नादौन विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन आमदार झाले. आता त्यांची हिमाचलचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.

हेही वाचा : सुखविंदर यांनी ९० च्या दशकात पीसीओही चालवला { सुखविंदर सिंग सुक्खू यांना लहानपणी कुटुंबीय श्यामा म्हणत. {काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना त्यांचा नेहमीच विरोध होता. { कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी आणि अभ्यासासाठी सुखविंदर यांनी ९० च्या दशकात पीसीओही चालवला. {२०१४ मध्ये मोदी लाटेत लोकसभेच्या चारही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला, तेव्हा वीरभद्र सिंह यांनी पराभवासाठी संघटना जबाबदार असल्याचे सांगितले, तर सुखविंदरसिंग सुक्खू यांनी पराभवासाठी सरकार जबाबदार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...