आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालेन्सकार्ट | आयवेअर कंपनी {स्थापना ः २०१० {मूल्यांकन ः ३७ हजार कोटी रु.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत देशात १०० स्टार्टअप युनिकॉर्न होते. म्हणजे त्यांचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होते. पण ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या ८५ वर आली आहे. यापैकी काही स्टार्टअप्स मजबूत ताळेबंद घेऊन पुढे जात आहेत. ऑनलाइन तसेच ऑफलाइन चष्मे, लेन्स विकणारी लेन्सकार्ट कंपनी हे असेच एक नाव आहे. लेन्सकार्ट अवघ्या दशकभरापूर्वी अस्तित्वात आले, पण त्याचे मूल्यमापन सातत्याने वाढत आहे. जुलै २०२१मध्ये त्याचे मूल्यांकन २.५ अब्ज डाॅलर होते. आता ते ८० टक्क्यांनी वाढून ४.५ अब्ज डाॅलरपेक्षा जास्त झाले आहे. जुलैमध्ये अल्फा वेव्ह ग्लोबलकडून २०० दशलक्ष डाॅलर निधी उभारल्यानंतर लेन्सकार्टचे मूल्यांकन सलग तिसऱ्यांदा वाढले. कंपनीचा महसूलही वाढत आहे. २०२२ आर्थिक वर्षात ते ६६% वाढून १५०२ कोटी रु. झाले. मात्र, कंपनीला १०२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. लेन्सकार्ट या वर्षाच्या अखेरीस शेअर बाजारात नोंदणीकृत होण्याच्या विचारात आहे. लेन्सकार्टचे सहसंस्थापक पीयूष बन्सल हे शार्क टँकच्या सीझन २ चे जजदेखील आहेत. या आठवड्याच्या ब्रँड स्टोरीमध्ये लेन्सकार्टबाबत जाणून घेऊ.
लेन्सकार्टची बाजारपेठ 70 लाखांहून ग्राहक लेन्सकार्टचे भारत आणि विदेशात मिळून 60% व्यवसाय मेट्रो शहरांत होतो. टियर-२, टियर-३ शहरांत व्यवसायवृद्धी होत आहे 03 हजार कोटी रु.त जपानच्या ओनडेज आयवेअर कंपनीचे अधिग्रहण केले २०२२ मध्ये 1100 स्टोअर्स भारतात लेन्सकार्टचे. प्रतिस्पर्धी टायटन आय प्लसचे ७६० स्टोअर्स आहेत 94% उत्पन्न आयवेअर उत्पादनांच्या विक्रीतून होते, बाकी सबस्क्रिप्शनद्वारे 300 जण काम करतात इंजिनिअरिंग टीममध्ये, एकूण ५ हजार कर्मचारी आहेत
मायक्रोसॉफ्टचा अनुभव कामी आला दिल्लीच्या पीयूष बन्सल यांनी कॅनडातून इंजिनिअरिंग केले. दुसऱ्या वर्षीच मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप केली, त्याचदरम्यान त्यांना बिल गेट्स यांना भेटण्याची संधीही मिळाली. एका मुलाखतीत पीयूष यांनी सांगितले की, बिल गेट्सच्या घरी जाताच जग बदलण्याची कल्पना त्यांना सुचली. पुढे यातूनच लेन्सकार्ट सुरू करण्याचा आत्मविश्वास आला. पीयूष यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये एक वर्ष काम केले.
सुरुवात : रिटर्न पॉलिसीद्वारे बाजारात स्थान निर्माण केले लेन्सकार्टची स्थापना नोव्हेंबर २०१० मध्ये अमित चौधरी, सुमीत कपाही व नेहा बन्सल यांच्यासह पीयूष बन्सल यांनी केली. यापूर्वी तिघांनी मिळून ‘व्हॅल्यू टेक्नॉलॉजीज’ ही ई-कॉमर्स फर्म स्थापन केली. त्यानंतर २०१० मध्ये अमेरिकेत फ्लायर नावाने काँटॅक्ट लेन्स व चष्मे विक्री सुरू केली. पीयूष सांगतात, भारतातील निम्मी लोकसंख्या डोळ्यांच्या समस्येकडे लक्ष देत नाही. येथून त्याला चष्मा विकण्याची कल्पना सुचली. एक दशकापूर्वी भारतात चष्मा आणि लेन्सची ऑनलाइन विक्री करणे अत्यंत कठीण होते आणि बाजारात असंघटित दुकानांचे वर्चस्व होते. >पीयूष यांनी १४ दिवसांसाठी ‘नो क्वेश्चन आस्क्ड रिटर्न पॉलिसी’ आणली. चष्म्यांसाठी कॉल सेंटरही सुरू केले. बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला.
रणनीती : चष्मा व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्यावर यश लेन्सकार्ट (व्हॅल्यू टेक्नॉलॉजीज) ला बाजारात प्रवेश केल्यावर लवकर यश मिळाले. यानंतर आयडीजी व्हेंचर्सने लेन्सकार्टमध्ये २२ कोटी रु. गुंतवणूक केली, मात्र केवळ चष्मेच नाही, तर पिशव्या, दागिने आणि घड्याळेही विकावी लागतील, अशी अट होती. पण, पीयूष यांना फक्त चष्म्यांचा व्यवसाय करायचा होता. दरम्यान, रॉनी स्क्रूवाला यांनी पीयूष यांना भेटण्यासाठी मुंबईला बोलावले. त्यांनी व्हॅल्यू टेक्नॉलॉजीजमध्ये गुंतवणूक केली होती. स्क्रूवाला यांनी त्यांना फक्त चष्म्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही. >लेन्सकार्टने गुंतवणूकदाराच्या सांगण्यावरून बॅग, घड्याळेही विकली. २०१३ मध्ये उर्वरित व्यवसाय बंद केल्यावर त्यांनी चष्म्यांवर लक्ष केंद्रित केले.
क्षमता : सर्वात मोठे स्वयंचलित उत्पादन युनिट लेन्सकार्टचे भारतातील दिल्ली, गुरुग्राम तसेच चीनमधील झेंगझोऊ येथे उत्पादन युनिट आहेत. पण आता कंपनी सर्व उत्पादन भिवाडी, राजस्थानमध्ये केंद्रित करण्याचा विचार करत आहे. कंपनीने भिवाडी येथे देशातील पहिल्या आणि जगातील सर्वात मोठ्या स्वयंचलित चष्मा निर्मिती केंद्राची स्थापना केली आहे. लेन्स लॅब आणि फ्रेम मॅन्युफॅक्चरिंग सेंटरदेखील आहे. लेन्सकार्टने अत्याधुनिक वितरण केंद्र बनवण्यासाठी अॅडव्हर्ब टेक्नाॅलाॅजीजशी करार केला आहे. कंपनीचे सर्व उत्पादन युनिट भिवाडी येथे स्थलांतरित करण्याचा विचार आहे. >भिवाडी (राजस्थान) उत्पादन युनिटमध्ये मोबाइल बॉट्सचा वापर होतो आणि ते दरवर्षी १ कोटी ग्राहकांसाठी चष्मा बनवू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.