आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • One Should Connect With Nature For Peace Of Mind | Article By Pt. Vijayshankar Mehata

जीवनमार्ग:मनःशांतीसाठी निसर्गाशी नाते जोडले पाहिजे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आचरण भ्रष्ट असेल तर मनाला कधीही शांतता लाभू शकत नाही. सध्या आपल्या देशातील बहुतांश लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ, हताश आणि बेचैन आहेत. भ्रष्ट आचरणालाच भ्रष्टाचार म्हणतात. कारण आपण सगळेच काही ना काही भ्रष्टाचाराच्या श्रेणीत येणारे करत असतो. भ्रष्टाचार म्हणजे फक्त लाच देणे-घेणे किंवा पैशाचा गैरवापर करणेच नव्हे. खरे तर पंचतत्त्वांनुसार प्रामाणिकपणे जगणे हेच योग्य आचरण आणि पंचतत्त्वांशी छेडछाड करणे हा भ्रष्टाचार आहे. अधिकृत व्याख्या काहीही असो, पण धार्मिक संदेश हाच आहे की, भ्रष्टाचार करत असल्यास तर आपण कधीच शांत राहू शकत नाही.

पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश यांच्याशी आपल्या वर्तनाबद्दल आपण अधिक जागरूक असले पाहिजे. भोग, आहार आणि निद्रा या तिन्ही गोष्टींशी आपण भरपूर छेडछाड केली आहे आणि आपण अस्वस्थ होतो तेव्हा जिथे अशांतता असते तिथेच शांततेचे मार्ग शोधत असतो. कोणी मोबाइलमध्ये शांतता शोधत असतो, कोणाला पैशात शांतता दिसते, तर कोणाला एखाद्याच्या सहवासात ती मिळते. मात्र, ही सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाची साधने आनंद आणि सुविधा देऊ शकतात, पण मनःशांतीसाठी माणसाला निसर्गाशी नाते जोडावे लागेल, हे सत्य आहे.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...