आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण:न्यूयॉर्कमध्ये केवळ 33 टक्के लोकांचे स्वतःच्या मालकीचे घर

सँड्रा गार्सियाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क हे भाडेकरूंचे शहर आहे. अमेरिकेतील सुमारे ६६ टक्के कुटुंबांकडे स्वतःची घरे आहेत. न्यूयॉर्क शहरात ही संख्या निम्मी आहे. ब्रॉन्क्स परिसरात पाचपैकी एका कुटुंबाकडे घर आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहरात राहणे महागडे आहे. तरीही शहरात लोकांची झुंबड उडते. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जनगणना ब्युरोनुसार, २००० ते २०२० दरम्यान आठ लाखांहून अधिक लोक शहरात आले. या कालावधीत फक्त ४, ३८,०८८ निवासी घरे बांधण्यात आली आहेत.

शहरातील घरांचे भाडे खूप आहे. मॅनहॅटनमध्ये मे महिन्यात सरासरी भाडे ३ लाख रुपयांपेक्षा अधिक होते. हे आतापर्यंतचे सर्वोच्च भाडे आहे. याबाबत भाडेकरूंना दिलासा नाही. या आठवड्यात भाडे मार्गदर्शक मंडळाने अपार्टमेंटच्या भाड्यात ३.२५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एनवाययू फरमान गृहनिर्माण संशोधन केंद्राचे संचालक चार्ल्स मॅकनेमी यांच्या मते, शहरात लोकांची वारंवार ये-जा, घरांची कमतरता आणि जुने अपार्टमेंट परवडणारे नसल्यामुळे गृहनिर्माण बाजार दबावाखाली आला आहे. अनेक लोक घरे विकत घेतात किंवा चांगल्या भाड्याने देतात. भाडे नियंत्रक कार्यालयाच्या मते, न्यूयॉर्कमध्ये कमी उत्पन्न असलेली १२ लाख कुटुंबे आहेत. त्यापैकी ७८ टक्के भाड्याच्या घरात राहतात. त्यांना उत्पन्नाच्या तीस टक्क्यांहून अधिक रक्कम भाड्यावर खर्च करावी लागते.