आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट भाष्य:केवळ इम्रानच देऊ शकतात लष्कराला आव्हान

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये जशास तसे हा नियम गरज पडल्यास इम्रान चेंडूशी छेडछाड करतील, बलाढ्यांवर वाईट आक्षेप घेतील आणि स्वत:ला पूर्ण संघ समजतील. पाकिस्तानात कॅसिनोचे लॉजिक चालते. तुमच्याकडे कोणते पत्ते आहेत, किती कौशल्य आहे, किती पैसे आहेत याने काही फरक पडत नाही. विजय नेहमीच ‘हाऊस’चा होतो. ते तुम्हाला आवडो वा न आवडो, ‘हाऊस’ला उद्ध्वस्त करण्यासाठी इम्रान खानसारखाच कोणी तरी हवा. पाकिस्तानातील कारस्थानांची उकल हे क्रिकेटमधील पांडित्यासारखेच राष्ट्रीय मनोरंजन आहे. पण, इम्रान खानवरील प्राणघातक हल्ल्याच्या अयशस्वी प्रयत्नाने राजकीय षड््यंत्रांपासून क्रिकेटपर्यंत पोहोचलेल्या पंडितांनाही चकित केले. तुम्ही म्हणाल, राजकीय षड््यंत्राची बाब ठीक आहे, पण त्यात क्रिकेटचा समावेश का करावा? आम्ही हे स्पष्ट करू. आधी सामान्य लष्करी राजकीय कटापेक्षा वेगळ्या असलेल्या या घटनेशी संबंधित पाच गोष्टी पाहू.

पाकिस्तानात राजकीय हत्या होत आहेत आणि त्यात लष्कराचा प्रत्यक्ष (झुल्फिकार अली भुत्तो प्रकरणात) किंवा अप्रत्यक्ष (बेनझीर भुत्तो प्रकरणात) हात आहे. पण हत्येचा प्रयत्न अयशस्वी होण्याचा प्रकार सहसा होत नाही. एक अपवाद आधीच झाला आहे. पण प्रश्न असा आहे की, अलीकडील प्रयत्न अयशस्वी का झाले? या उपखंडात सैनिकांच्या भाषेत प्रत्येक जीवे मारण्याच्या प्रयत्नानंतर त्याचा बळी एक तर ‘सहा फूट खाली’ जातो किंवा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ‘खूप चांगला माणूस’ होतो. लष्कराकडे बोट दाखवण्याचे धाडस कोणी करत नाही. इतर ठिकाणांप्रमाणेच पाकिस्तानी जमाव खूप मोठा, संतप्त आणि अनियंत्रितपणे हिंसक होतो. तो अमेरिकन इन्फर्मेशन सर्व्हिसेस सेंटर (सलमान रश्दींच्या पुस्तकाच्या निषेधार्थ) सारखी सुरक्षित संस्थादेखील नष्ट करू शकतो. गेल्या वर्षी फ्रेंच दूतावासाचीही त्याने जवळपास अशीच अवस्था केली, कारण तो मॅक्रॉन यांच्यावर नाराज होता. राजकारणी, क्रिकेटपटूंच्या घरांवर, देवस्थानांवर हल्ले न्याय्य मानले जातात. पण, एखाद्या कोअर कमांडरचे घर तर सोडाच, पण आजपर्यंत एकाही लष्करी अधिकाऱ्याच्या ठिकाणाला जमावाने लक्ष्य केलेले नाही. भारताप्रमाणे पाकिस्तानात पश्चिम, उत्तर, दक्षिण इ. लष्करी कमांड नाही. प्रमुख क्षेत्रांचे ९ कमांड्स आहेत आणि त्यांचे कमांडर सुप्रसिद्ध ‘पॉलिट ब्युरो’च्या बरोबरीचे आहेत, त्यांना लष्करप्रमुखही घाबरतात. कोअर कमांडरशी गैरवर्तन करण्याचे धाडस कोणी करत नाही. बलाढ्य व्यावसायिक कोअरचे तर कुणी काहीही करू शकत नाही. भारतापासून जवळ असलेली कराची, लाहोर, मंगला, मुलतान, रावळपिंडी इ. ठिकाणे लष्करी दृष्टीने अधिक महत्त्वाची असली तरी राजकीय-सामरिक दृष्टिकोनातून पेशावर कमांड सर्वात वर आहे. वझिरीस्तानी आणि पाकिस्तानी तालिबानच्या बंडखोरीचा मुकाबला करून ती अफगाणिस्तानची देखरेख आणि नियंत्रण करते. ती ड्युरंड लाइनचे रक्षण करते, जी अफगाणिस्तानातील कोणत्याही सरकारने स्वीकारलेली नाही. सत्तेच्या संरक्षणाखाली कार्यरत असलेल्या सर्व दहशतवादी नेटवर्कचे ते ‘बॅक ऑफिस’देखील आहे. बिन लादेन कुठे राहत होता, हे आठवा. तिथे भारतीय मिराज विमान जैश-ए-मोहंमदच्या तळावर क्षेपणास्त्रे डागत होते. पाकिस्तानच्या अनेक भागांत निदर्शने सुरू असताना पेशावरमध्ये सर्वात भयंकर निदर्शने झाली, तिथे हजारोंच्या जमावाने कोअर कमांडरच्या निवासस्थानाला वेढा घातला. जमावाने लष्करालाही मागे ढकलले आणि गोळ्यांचा सामना करत घोषणाबाजी केली - ‘यह जो दहशतगर्दी है, इसके पीछे वर्दी है!’ ही घोषणा आज पाकिस्तानात दुमदुमत आहे. यापूर्वीही अधूनमधून अशी घोषणाबाजी करण्यात आली होती, मात्र विरोधी पक्षनेते ती शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या शूर, सक्षम सैन्यावर कोणीही हल्ला करू नये, असा संदेश यातून देण्यात येत असे

म्हणून आमचा तिसरा प्रश्न असा आहे की, सैन्याप्रती ही भावना कमकुवत का झाली? प्राणघातक हल्ल्यापूर्वी पाकिस्तानी मीडियाच्या मथळ्यांकडे लक्ष द्या. त्यांच्या एका प्रमुख राजकीय सहायकाने खुनाचा कट रचणाऱ्यांची नावे उघड केली होती. अशा लोकांच्या शीर्षस्थानी ज्यांच्या घराला इतक्या हिंसक आणि संतप्त जमावाने वेढा घातला होता त्या मेजर जनरल फैसल नसीर यांचे नाव होते. असा हिंसक जमाव तेथे दीर्घकाळ दिसला नव्हता. जे लोक या हत्येसाठी लष्करी जनरल किंवा आयएसआय प्रमुखांना दोषी ठरवत आहेत ते बहुधा परदेशात सुरक्षित जीवन जगणारे इतिहासकार आहेत, परदेशी किंवा हद्दपारीचा सामना करणारे पाकिस्तानी आहेत. तसे पाहता देशाबाहेर राहणेदेखील सुरक्षित नसल्याचे अलीकडील घटनांवरून दिसून येते. अलीकडेच नेदरलँडमध्ये राहणाऱ्या एका असंतुष्ट पाकिस्तानी व्यक्तीची हत्या झाल्याचे आढळून आले आणि याप्रकरणी ब्रिटनमध्ये आयएसआयच्या ‘एजंट’वर आरोप ठेवण्यात आले आहेत. मग आता पाकिस्तानच्या सर्वात लोकप्रिय नेत्याच्या जवळचे लोक त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लष्कराच्या सर्वोच्च जनरलवर कसा करतात? ज्या पंतप्रधानांना त्यांनी बेकायदेशीरपणे ‘निवडले’ आणि ‘बरखास्त’ केले, त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आयएसआयच्या प्रमुखाला प्रथमच पत्रकार परिषद बोलावावी लागली. यावरून स्पष्टपणे दिसून येते की, लोकप्रिय राजकारण्याला लष्कर प्रथमच घाबरले आहे. म्हणून पाचवा प्रश्न असा की, असे भयंकर इशारे आणि लष्कराच्या जनरल हेडक्वार्टरकडून शत्रुत्वाची उघड घोषणा होऊनही इम्रान यांनी ‘समजूतदारपणा’ का दाखवला नाही आणि इस्लामाबादचा मार्च स्थगित का केला नाही?

या पाच प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांचा तपशीलवार विचार करता येईल. पण, या सगळ्याचे उत्तर दोन शब्दांत किंवा इम्रान खान या एका नावात सापडू शकत असताना यावर एवढी मेहनत का करायची? हे आपल्याला मी जिथून सुरुवात केली किंवा पाकिस्तानमधील कटकारस्थान आणि क्रिकेटचे स्पष्टीकरण देणाऱ्या पंडितांनाही हा हल्ला आश्चर्यचकित करेल, असे मी का म्हटले होते तिथे परत घेऊन जाते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...