आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंग इंडिया:आपल्यासाठी सोयीस्कर अशी माहितीच मोबाइलमध्ये साठवा

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमनला एक दिवस खंडणीची मागणी करणारा संदेश आला आणि न दिल्यास तिची आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. ती छायाचित्रे बनावट होती आणि ती कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार करण्यात आली होती. ती चित्रे पाहून सुमन थक्क झाली, कारण ती खरी वाटत होती. मग ती काय करू शकते? तुम्ही तिच्या जागी असता तर काय केले असते? एखादी कमकुवत मुलगी असती तर तिने हार पत्करली असती आणि मानसिक व भावनिक छळ सहन करत राहिली असती. धाडसी मुलीने तिच्या कुटुंबाला सांगितले असते. त्याच वेळी एखाद्या ताकदवान तरुणीने थेट पोलिस ठाण्यात जाऊन हकीकत सांगितली असती.

परंतु, सुमन पॉवरफुल तर होतीच, पण तिच्याकडे बरीच माहितीही होती. तिने लगेच सायबर हेल्पलाइन १९३० आणि cybercrime.gov.in वापरून तक्रार दाखल केली. यानंतर तिने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली. प्रत्येक सोशल मीडियावरील अपमानास्पद पोस्ट, प्रोफाइल आणि चित्रांबाबत तक्रार नोंदवता येते, हे सुमनला माहीत होते. आरोपीने सुमनची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तिने बचावाची तयारी केली होती. आपली सुरक्षा सुनिश्चित केल्यानंतर सुमनने दोषीला शिक्षा करण्यावर लक्ष केंद्रित केले. तिने भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांचा वापर करून कायदेशीर कारवाई सुरू केली. गुन्हेगारी हेतूने छायाचित्रांशी छेडछाड करणे हा गंभीर गुन्हा आहे, हे सुमनला चांगलेच ठाऊक होते. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील साहित्य पसरवणेदेखील कायद्याने दंडनीय आहे. तिने भादंविच्या कलम ४६५, ४६९, ५०९, ५०७ आणि आयटी कायद्याच्या कलम ६६, ६७ आणि ६७-अ चा वापर करून आपला दावा मजबूत केला.

सायबर गुन्ह्यांसाठी विशेष जागरूकता का गरजेची आहे? कारण, हे केव्हाही आणि कोणाबाबतही घडू शकते, यामुळे तुमच्या आत्मविश्वासाला गंभीर हानी पोहोचते, कारण मोबाइल फोनच्या वास्तविकतेबद्दल आपल्याला सहसा शिकवले जात नाही. सुमनचा किंवा तिच्यासारख्या परिस्थितीतील प्रत्येक व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे समाजात आपली प्रतिष्ठा गमावण्याची भीती. सायबर क्राइमच्या याच पैलूमुळे लोक घाबरतात आणि विचार करण्याची क्षमता गमावतात.

सत्य हे आहे की, एखादा फोटो तुमच्या मोबाइल स्टोअरमध्ये ठेवला असेल आणि तुम्ही तो कोणालाही पाठवला नसेल, तर तो लीक होणे ही काही मोठी गोष्ट नाही. तुमचे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड व्हाॅट्सअॅप चॅट कदाचित अनेकांना माहीत असतील. व्हॉट्सअॅपचा इतिहास कोणत्याही कंपनीच्या सर्व्हरवरून हटवता येत नाही. तुम्ही पाठवलेले ई-मेल एकाधिक राउटरमधून जातात, त्याचा गैरवापर होऊ शकतो. तुम्ही उबेर वापरता तेव्हा तुम्ही जाण्याचे ठिकाण आणि आगमनाची वेळ याविषयी माहिती देता. आपले अनेक अॅप्स आपले मायक्रोफोन, कॅमेरा, फाइल्स आणि स्थानाचाही अॅक्सेस आवश्यकता नसताना मिळवतात. आणि एक प्रवेश अमर्यादित असतो, तुम्ही ते अॅप वापरत असो की नसो. आपला डेटा सार्वजनिक होत नसेल तर याचा अर्थ आपण अजून सेलिब्रिटी नाही आहोत. पण, सुमनच्या बाबतीत असे घडले की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने हॅकरला पैसे देऊन तिच्या फोनमधून फोटो मिळवले होते. मग आपण सोशल मीडियाचा वापर थांबवावा का? याचे उत्तर तुम्हालाच शोधावे लागेल. परंतु, आपण खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या फोनवर फक्त गोपनीय डेटा आणि फोटो साठवा, जो तुम्हाला इतरांना शेअर करण्यास सोयीस्कर आहे, अन्यथा ती माहिती तुमच्याविरुद्ध सहजपणे वापरली जाऊ शकते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

डॉ. अमित दुआ सहायक प्राध्यापक, बिट्स पिलानी आणि ‘मशीन लर्निंग’ पुस्तकाचे लेखक

बातम्या आणखी आहेत...