आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक घेण्याची प्रक्रिया काय?:अविवाहित पुरुष केवळ मुलास दत्तक घेऊ शकतात

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मुले दत्तक घेण्याची परंपरा वाढली आहे. अपत्य नसलेले आई-वडील दत्तक घेऊ इच्छितात. दत्तक घेण्याचे काही नियम तयार करण्यात आले आहेत. सुप्रीम काेर्टाच्या वकील आभा सिंह दत्तक प्रक्रियेबद्दल सांगतात..

मुलांना काेण,कशा पद्धतीने दत्तक घेऊ शकताे?
देशात दत्तक घेण्यासाठी सेंट्रल ऑडाेप्शन रिसाेर्स अथाॅरिटी (कारा) आहे. महिला व बालकल्याण विभागांतर्गत ही यंत्रणा आहे. ही नाेडल यंत्रणा मानली जाते. बेवारस मुले तसेच आई-वडिलांनी साेडलेल्या मुलांना दत्तक घेतले जाऊ शकते. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांना (पीएपी) काराला आपला अर्ज संकेतस्थळावरून पाठवावा लागेल. त्याची पडताळणी काराचे अधिकारी करतात.

आवश्यक कागदपत्रे काेणती?
मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, विजेचे देयक इत्यादी काेणतेही ओळखपत्र आवश्यक आहे. विवाह प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रही लागेल. त्यात दांपत्य अपत्य हाेण्यासाठी सक्षम नाही, असे स्पष्ट नमूद असावे. कुटुंबाचे पासपाेर्ट फाेटाे, राेजगाराचा तपशील, तीन वर्षांचे आयकर विवरण द्यावे लागेल, दाेन प्रसिद्ध व्यक्तींचे शिफारसपत्र लागेल.

सिंगल व्यक्तीला अधिकार आहे?
सिंगल असलेल्या व्यक्तीला मूल दत्तक घेता येते. परंतु स्वत:च्या हयातीनंतर मुलाच्या संगाेपनाची जबाबदारी नातेवाईक घेतील याची हमीदेखील द्यावी लागते.

विवाहित असणे अनिवार्य आहे?
नाही. काेणताही शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती व्यक्ती मूल दत्तक घेऊ शकते. अविवाहित पुरुष केवळ मुलास दत्तक घेऊ शकतात. परंतु महिला मुलगा किंवा मुलगी यापैकी काेणालाही दत्तक घेऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...